मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 14 March 2024 : सूर्याच्या राशीपरिवर्तनात आजचा गुरुवार तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 14 March 2024 : सूर्याच्या राशीपरिवर्तनात आजचा गुरुवार तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 14, 2024 01:08 PM IST

Horoscope Today 14 march 2024: आज १४ मार्च २०२४ गुरुवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

आजचे राशीभविष्य १४ मार्च २०२४
आजचे राशीभविष्य १४ मार्च २०२४

आज पंचमीचा चंद्र दिवस रात्र मंगळाच्या आणि चंद्र शुक्राच्या राशीतून भ्रमण करणार आहे. सूर्याचा मीन राशीतील प्रवेश आणी वैधृती योग कोणत्या राशीसाठी ठरणार फायदेशीर! मेष ते मीन सर्व राशीच्या लोकांना कसा जाईल आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर होईल. नोकरी व व्यवसायात घेतलेल्या निर्णयांपासून फायदा होईल. प्रत्येक काम खोलवर चिंतन करून कराल. प्रसिद्धी मिळेल. भरभराटीचा दिवस आहे. खेळाडूसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल.

वृषभः 

आज सहकर्मींना विश्वासात घेऊन काम करा. मालमत्तेसंबंधी प्रश्न रेंगाळू शकतात. निद्रानाशाचे विकार उद्भवू शकतात. मानसिक अस्थिरता असू शकते. कटकटी निर्माण करणारे योग आहेत. व्यवसायिकांनाही आर्थिक फसवणुक संभवते. व्यवहार काळजीपूर्वक करा. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. काळजीपूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या.

मिथुन: 

आज विश्वासपूर्ण वातावरण राहील. आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. प्रत्येक गोष्टीचा विचार करणे गरजेचे ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. एखाद्या विधायक कार्याची मुहूर्त निघेल. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. जोडीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न रमेल. 

कर्कः 

आज मतभेद होऊ शकतात. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. घरातील वातावरण काही वेळा त्रासदायक ठरेल. करिअरमध्ये मानसिक अस्वस्थता वाटेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. निरर्थक कामात आपला वेळ जाईल. वेळेचा अपव्यय टाळा. मालमत्ते बाबत अडचण येऊ शकते. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. वाद टाळा. मन अप्रसन्न राहील.

सिंह: 

आज मनोधैर्य सांभाळा. प्रेम प्रकरणात अडथळे संभवतात. निर्णयात ठामपणा नसेल त्यामुळे कामाची गती मंद होईल. काळजी घ्या. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. विचारा अंतीच निर्णय घ्यावेत. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. गुंतवणुक करू नका. संततीकडे विशेष लक्ष द्यावे. मान प्रतिष्ठा संभाळावी. विरोधकांचा त्रास जाणवेल.

कन्याः 

आज कामात यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योगात तेजी राहील. कल्पनाशक्तीत सुधारणा होईल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होऊ शकते. शुभ कार्यात सहभागी व्हाल. लाभ अधिक होईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासातुन लाभ होतील. 

तूळ: 

आज भौतिक सुख-साधनांची आवड निर्माण होईल. खूप स्वप्ने रंगवली असतील, त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यश मिळवाल. आपल्या कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढेल. आळशी वृत्ती टाळावी. ध्येयापासून विचलित होऊ नका. तुम्हाला तुमच्या कलागुणांचा फायदा होईल. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. 

वृश्चिक: 

आज नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. कौशल्य कामी येईल त्यामुळे फायदा होईल. लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशी व्यवहाराशी संबंध आहे त्यांना छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रिय जनांच्या भेठीगाठी होतील. अहंकारी वृत्तीचा त्याग करून वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

धनुः 

आज आत्मविश्वास द्विगुणित होईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. मनोवांच्छित फळ मिळेल. परिवारात शुभ कार्याचे आयोजन केले जाईल. खर्च सांभाळून करा. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होऊ शकतो आणि वारसा हक्काचे प्रकरण मार्गी लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल.

मकरः 

आज चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. व्यवसायात कामाला प्राधान्य द्या. महत्वपूर्ण कागदपत्रे संभाळा. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण कराल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पन वाढेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहील. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहील. 

कुंभः 

आज मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. नवीन वस्तूंची खरेदी कराल. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदारांना बढती प्रमोशन मिळू शकते. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नवीन कल्पना आमलात आणा. संधीचं सोनं करा. विचलीत होऊ नका. शासकीय कामात यश प्राप्त होईल.

मीनः 

आज कलाकारांना कला क्षेत्रात वाव मिळेल पण त्यापासून आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावाद उद्भवू शकतात. स्वप्नपूर्तीसाठी मानसिक व बौद्धिक ताण वाढेल. प्रेमप्रकरणात गैरसमज त्रासदायक ठरतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. ताण-तणाव व थकवा जाणवेल. कर्ज घेणे टाळा.

WhatsApp channel