मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 14 January 2024: भोगीचा दिवस कुटूंबातील सुखद वातावरणाचा! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 14 January 2024: भोगीचा दिवस कुटूंबातील सुखद वातावरणाचा! वाचा राशीभविष्य!

Jan 14, 2024 09:15 AM IST

Horoscope Today 14 January 2024: आज १४ जानेवारी २०२४ रविवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today horoscope 14 January 2024
Today horoscope 14 January 2024

आज रविवार १४ जानेवारी रोजी, चंद्र दिवस रात्र राहु आणि मंगळाच्या मालकीच्या ग्रह नक्षत्रातुन गोचर करतोय. शनि-चंद्राचा विषयोग घटीत होणार आहे. आज विनायक चतुर्थी, भोगी आणि धनुर्मास समाप्ती आहे. कसा राहिल सुट्टीचा दिवस! वाचा राशी भविष्य!

मेष: 

आज नवीन प्रॉपर्टीसंबंधी विचार प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. कार्याचा विस्तार वाढेल. आर्थिक बाबतीत वृद्धी होईल.

वृषभः 

आज देश-विदेश फिरण्याचे योग येतील. नवीन आर्थिक गुंतवणूक कराल. खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. इतरांचाही विचार करावा लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मनासारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. संततीच्या मनाचा आदर केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होईल. मुलेही खूष राहतील. भागीदारासोबत वादविवाद टाळा. मोठी आर्थिक फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. 

मिथुन: 

आज भोगी दिनी तुमच्याशिवाय कामे अडून राहतील. त्यामुळे समाजात मान मिळेल. नवीन जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील. याचा थोडा ताणही येईल. नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. व्यावसायिकांनी नोकरदारांवर अवलंबून न राहील्यास कमी त्रास होईल. प्रसिद्धी मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुंबात सलोख्याचे व आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल.

कर्क: 

आज मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल. अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. 

सिंह: 

आज नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहील. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल.

कन्या: 

आज नकारात्मक विचार होणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाण्याची शक्यता आहे. हप्ते वेळेवर फेडण्याची खबरदारी घ्यावी. रचनात्मक कामाकडे ओढ राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. कामामुळे थकवा जास्त जाणवेल. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. व्यापारात आपले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढेल. वरिष्ठ सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्या.

तूळ: 

आज बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. तापटपणा वाढेल. दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. दुसऱ्यावर कुरघोडी करण्या अगोदर विचार करावा लागेल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धीदायक होईल. आज केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल.

वृश्चिक: 

आज सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. व्यापारात स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. आजूबाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे. समाजात आपला मानसन्मान वाढेल. 

धनु: 

आज मानसिक अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल. हातात पैसा आल्यामुळे बरीच देणीही देऊन टाकाल. जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. व्यवसायात कोणतेही काम पूर्ण करायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. मन अशांत असल्यामुळे आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. धंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायद्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. कौटुंबिक ताणतणाव वाढू शकतात. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा.

मकर: 

आज पैसा वसूल करण्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागले तरी पैसे मिळणार आहेत. कष्टाला पर्याय नसला तरी प्रगती करणार आहात. एक वेगळाच उत्साह आणि आनंद लाभेल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. आजचा दिवस आपल्यास अत्यंत शुभ फलदायी ठरेल.

कुंभ: 

आज प्रचंड मेहनतीच्या मानाने मामुली यश मिळत असल्यामुळे थोडे निराश व्हाल. अशावेळी चुकते कुठे हे कळण्यासाठी त्यातील तज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी वाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवास निरर्थक ठरेल.

मीन: 

आज जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. आर्थिक घडी बसेल. संतती साठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची कास धराल. कलाकरांना संधी मिळतील. यशासाठी जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. स्वतःला सिद्ध कराल.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

WhatsApp channel