मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 13 March 2024 : कोणत्या राशींवर होईल गणपती बाप्पाची कृपा! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 13 March 2024 : कोणत्या राशींवर होईल गणपती बाप्पाची कृपा! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 13, 2024 10:21 AM IST

Horoscope Today 13 march 2024 : आज १३ मार्च २०२४ बुधवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

आजचे राशीभविष्य १३ मार्च २०२४
आजचे राशीभविष्य १३ मार्च २०२४

आज विनायक चतुर्थीचा चंद्र अहोरात्र मंगळाच्या राशी तुन आणि केतुच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. ऐंद्र योग व गुरू, हर्षलच्या संयोगात गजकेसरीयोग घटीत होत आहे. मेष ते मीन सर्व राशीच्या लोकांना कसा जाईल आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज आंनदाची बातमी मिळेल. व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभेल. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होईल. मन प्रसन्न व आनंदी राहील.

वृषभः 

आज मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. स्वत:चे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. चिकाटी जिद्द आणि स्थैर्य कामी येईल. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. उद्योग व्यवसायात भरभराट होऊ शकते. अचानक लाभ होतील. विद्यार्थी प्रगती करतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. 

मिथुनः 

आज घरामध्ये अचानक उद्भभवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. नोकरीत बदल करू शकतात. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यापारात आर्थिक उन्नती होईल. यश निश्चित लाभेल. प्रवासातून लाभ होईल.

कर्कः 

आज आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. सामाजिक क्षेत्रात काम कराल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल. उद्योग व्यापार तेजी राहील. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. प्रयत्न केल्यास थकित रक्कम प्राप्त होईल. आपली आर्थिक बाजु भक्कम राहील.

सिंहः 

आज आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. कलाकरांना संधी मिळतील. जिद्दीने कामाला लागाल. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. आत्मविश्वास वाढल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.

कन्याः 

आज द्विधा मन:स्थितीमुळे तुमचा गोंधळ होऊ शकतो. एकंदरीत तब्येत नाजूक राहील. कामे उलटपालट होऊन जातील. अतिरिक्त राग आणि वादविवाद टाळा. नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. शारिरिक व्याधी उद्‌भवतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्च वाढतील.

तूळ: 

आज कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. यामुळे रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग रहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल. आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिकः 

आज यशप्राप्ती लाभेल. पैशाची कामे मनासारखी घडतील. परिस्थितीचा उत्तम आढावा घेताना स्वतःची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. मानसिक सौख्य लाभेल. 

धनुः 

आज नवीन प्रॉपर्टी संबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील. पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहमान आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. भावडांशी वादविवाद टाळा. नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहील.

मकरः 

आज कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. शासकीय सेवेत प्रलोभनांना बळी पडू नये. कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा. व्यापारात कर्जप्रकरणे नामंजूर होतील. कर्ज घेणे देणे टाळावे. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. हानीकारण दिनमान आहे. लेखी कागदपत्रा शिवाय मोठे व्यवहार टाळावेत. शक्यतो प्रवास टाळावेत. वाहने सावकाश चालवा. अपघात भय संभवते. शारिरिक व्याधी कडे दुर्लक्ष करू नये. आहारावर नियंत्रण ठेवा. काळजी घ्या.

कुंभः 

आज व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्याआवडी निवडी बदलत राहतील. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्या फार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहू शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्या. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. 

मीनः 

आज ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा. अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे. कायदा व नियमच्या विरोधात काम केल्यास शिक्षा होण्याची शक्यता आहे. नेहमीच्या कामात खुप मेहनत घ्यावी.

WhatsApp channel