Horoscope Today 13 January 2024: शनिवारचा दिवस किती फायदेशीर ठरेल, वाचा राशीभविष्य!-horoscope today 13 january 2024 daily rashi bhavishya in marathi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 13 January 2024: शनिवारचा दिवस किती फायदेशीर ठरेल, वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 13 January 2024: शनिवारचा दिवस किती फायदेशीर ठरेल, वाचा राशीभविष्य!

Jan 13, 2024 08:15 AM IST

Horoscope Today 13 January 2024: आज १३ जानेवारी २०२४ शनिवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 13 January 2024
Horoscope Today 13 January 2024

आज शनिवार १३ जानेवारी रोजी, चंद्र मंगळाच्या आणि श्रवण या स्वनक्षत्रातुन गोचर करीत असुन शनिच्या राशीतुन संक्रमण करीत आहे. आज शनिवारी दिनमानावर विशेषत शनिदेवाचा प्रभाव राहील. सिद्धी योग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरणार, वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज कामे करून घेण्यासाठी पडती बाजू घेतली तरी चालणार आहे. खरेदीचे योग येतील. घरामध्ये तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. आर्थिक निर्णय जबाबदारीने घ्यावे. दुसऱ्याच्या मनातले तुम्ही बरोबर ओळखाल. मानसिक स्वास्थ सांभाळा. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. कर्ज प्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते.

वृषभ: 

आज कामाचा वेग आणि धाडस कौतुकास्पद असेल. व्यवहारात कोणत्या वेळी कसे निर्णय घ्यावे याची जाण येईल. धंद्यात चांगली प्रगती कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या इष्ट देवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. कुटुंबासोबत दुरवरच्या प्रवासाचं नियोजन कराल. आरोग्याच्या तक्रारी असतील.

मिथुन: 

आज नोकरीत कौतुकास पात्र ठराल. व्यवसायात कष्ट जास्त पण पैसा कमी अशी गत असेल. कलाकारांना आपली कला लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळेल. उत्तम कलाकृतीसाठी कौतुकास पात्र ठराल. फायदा तोटा बाजूला ठेवला तरी धंद्यामध्ये तुमच्या बुद्धीची झलक आणि योग्य समयसूचकता दिसून येईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. उत्तम दिवस राहील.

कर्क: 

आज नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी बदलाचे योग आहेत. दुसरा व्यवसाय चालू करण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. नोकरी ठिकाणी वातावरण उत्साही व आनंदी राहिल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. आहारावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. भौतिक सुख उत्तम मिळेल. प्रवासाचे योग आहे.

सिंहः 

आज संयमाची कसोटी तुम्हाला सांभाळावी लागेल. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाचे नियोजन केले तरी त्याची कार्यवाही न केल्यामुळे कामे उलटपालट होऊन जातील. रागाचा पारा एकदम चढल्यामुळे जवळचे लोक संभ्रमात पडाल. लाभदायक दिवस आहे. वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात उधारी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहील. परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.

कन्याः 

आज तुमचे वागणे सहनशक्तीच्या पलीकडे राहील. आपल्या हातून घडलेली एखादी चूक स्विकाराल. अती आत्मविश्वासामुळे तुमचे अंदाज चुकू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची कला नजरेत भरण्यासारखी समोर येईल. घरामध्ये स्फूर्तीदायक वातावरण निर्माण होईल. उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वाद विवाद टाळा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. जास्त ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. 

तूळ: 

आज कोणताही निर्णय आर्थिक व्यय होण्यासाठी कारणीभूत ठरेल. परदेशगमनाचे योग येतील. तुमचा धाडसी स्वभाव दिसून येईल. अभ्यासाची गोडी निर्माण होईल. बौद्धीक क्षेत्रात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. पाठीची दुखणी डोके वर काढतील. व्यायाम आणि औषधोपचार या दोहोंची साथ मिळेल. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.

वृश्चिकः

आज जोडीदार उत्तम आणि सुसंस्कृत मिळेल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तेवढाच खर्चिकपणाही वाढेल. अंधश्रद्धा ठेवण्यापेक्षा डोळसपणे एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागेल. व्यवसायात सर्व कामे एकट्याने करण्यापेक्षा योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन मनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा. प्रवासात विशेष काळजी घ्यावी लागेल.

धनुः 

आज जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक फायदा चांगला होईल. कामाचे उत्तम नियोजन कराल. आपल्या स्वतंत्र विचाराचा अभिमान बाळगाल परंतु सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. मालमत्ता संबंधी अडचणी येऊ शकतात. व्यवहार आणि भावना या स्वतंत्र गोष्टी आहेत. स्वत:ची कामे स्वतःच केलेली बरी पडतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. वैवाहिक सुखात वाढ होईल. लाभाचा दिवस आहे.

मकरः 

आज तब्येतीच्या तक्रारींमुळे मन:स्वास्थ्य लाभणार नाही. घरात चैनीच्या गोष्टी खरेदी केल्यामुळे खर्चात वाढ होईल. दिनमान कामाच्या दृष्टीकोनातून कष्टदायक असेल. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील. आशावादी दृष्टीकोनातून सतत विचार करावा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. शेअर्समधील गुंतवणूक लांबणीवर टाकणेच उत्तम राहील.

कुंभः 

आज ज्ञान आणि धडाडी यांच्या जोरावर सर्व गोष्टी तडीस न्याल. घरामध्ये अचानक एखाद्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल. भाग्याची साथ चांगली मिळेल. एखादी गोष्ट व्हावी अशी इच्छा असेल ती पूर्ण होण्याचा काळ आहे. त्यामुळे मूड चांगला राहील. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल, मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वृद्धी होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.

मीनः 

आज धार्मिक गोष्टींमध्ये पैसा खर्च कराल. आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. संकटाशी टक्कर देऊन आपले ध्येय गाठण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आज कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळेल. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधाच्या कामाला गती येईल. नवीन कल्पनांच्या जोरावर बरेच काही साधून जाल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसोबत मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे.  मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)