मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 13 february 2024: गणेश जयंतीचा दिवस ठरेल खास, आनंद व उत्साह वाढेल! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 13 february 2024: गणेश जयंतीचा दिवस ठरेल खास, आनंद व उत्साह वाढेल! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 13, 2024 09:27 AM IST

Horoscope Today 13 february 2024: आज १३ फेब्रुवारी २०२४ मंगळवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 13 february 2024
Horoscope Today 13 february 2024

आज मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी, चंद्र मीन राशीत भ्रमण करीत आहे. अंगारक योग आणि साध्य योगात कसा असेल मेष ते मीन सर्व राशींसाठी गणेश जयंतीचा आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज व्यवसायात खूप काम कराल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळेल. त्यामुळे आनंदी व उत्साही राहाल. नवीन मालमत्ता घेण्यासाठी प्रयत्नात राहाल. सहकार्य उत्तम मिळेल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. हाती घेतलेल्या कामात यशस्वी राहाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढती मिळेल. धावपळ फायदेशीर राहील. 

वृषभ: 

आज घरातील शांतता भंग होईल. वडिलोपार्जित मालमत्तेचे वाद चिघळतील. आनंद व उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. खूप दिवसांपासून अडलेली ऑर्डर हातात पडेल. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. एखाद्या आवडत्या व्यक्तिसोबत परिचय होईल व संवाद वाढेल आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. घर व वाहन खरेदीचा योग आहे. कौटुंबिक सामंजस्य राहील.

मिथुन: 

आज अडकलेले पैसे हाती येतील. श्रमसाफल्याचा अनुभव घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. परदेश प्रवासाचे बेत आखाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल.  कुटुंबातील सुखद वातावरण निर्माण होईल. 

कर्कः 

आज अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता संबंधातील समस्या दूर होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आर्थिक घडी बसेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची कास धराल. कलावंतांना उत्तम संधी व प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे.

सिंहः 

आज तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. राजकारणी लोकांना आपली बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. अनुभव घेतल्यानंतर लढा देण्याची पात्रता अंगी बाळगाल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. ताण तणावात्मक राहील. मानसिक स्वास्थ राखा.

कन्या: 

आज आपल्या मताशी ठाम राहाल. डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल. लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. 

तूळ: 

आज देश-विदेशात फिरण्यासाठी अडचणी उद्भवतील. मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल. मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्यवेळी समज द्यावी लागेल. कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका.

वृश्चिक: 

आज समोरच्या माणसाच्या गूढ वागण्याचा थोडा त्रासच होणार आहे. कोणालाही जामीन राहू नये. दुसऱ्यांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांना तुमची ठाम मते पटणार नाहीत. तेथे वादविवाद होऊ शकतात. भांडखोरपणाने इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी राहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. 

धनुः 

आज लांबच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नको तेथे खर्च झाल्यामुळे चिडचिड होईल. करिअरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. कोणतेही संशोधन चांगले कराल. कोणताही निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्यामुळे दारात आलेली संधी दार ठोठावून निघून जाऊ शकते. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. 

मकरः 

आज आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे असाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. कौटुंबिक सुखशांती आनंद दायक वातावरण राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल.

कुंभ: 

आज खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एकांतवास आवडेल. रोजगारात मनासारखी बढती व बदली होऊ शकते. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

मीन: 

आज आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात कामगारांना कितीही सवलती दिल्या तरी त्यांच्या त्रासापासून सुटका मिळणार नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील.