आज चंद्र रेवती नक्षत्रातून आणि नंतर मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे ग्रहण योग दिवसभर प्रभावात राहील कारण चंद्र दिवसभर राहू सोबत मीन राशीत राहील. रात्री मेष राशीत चंद्राच्या आगमनाने ग्रहण योग संपून गजकेसरी योग सुरू होईल. मेष ते मीन सर्व राशीच्या लोकांना कसा जाईल आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!
आज नवीन घर खरेदीचा योग आहे. प्रसिद्धीचे योग येतील. स्वकर्तुत्व सिद्ध करता येईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल. संगीत कार व गायक वादक यांना संधी मिळेल. गुंतवणूकीसाठी उत्तम दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल.
आज निर्णय योग्य ठरतील. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. अडलेली कामे मार्गी लागतील. रोजगारात प्रगती होईल. जबाबदारी वाढणार आहे. पराक्रम व साहसी वृत्तीत वाढ होईल. नवीन संधी सोडू नका. संबंध जुळण्याचा योग आहे. उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहेत.
आज शारिरिक स्वास्थ सांभाळा. आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थोडी संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ताणतणाव जाणवेल. युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. आपल्या व्यसनांना आवर घाला. अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यास कसरत करावी लागेल. आव्हान निर्माण होईल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.
आज महत्त्वपूर्ण कार्यात विशेष यश येईल. यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना अनुकूल दिनमान आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वतःच करा. मुलांच्या बाबतीत प्रसन्नतापूर्वक वातावरण राहणार आहे. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. मनोरंजनाकडे कल वाढेल. छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष द्या. धार्मिक कार्य करण्याची संधी मिळेल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल.
आज बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. घरगुती उपयोगी वस्तु खरेदी कराल. सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण होतील. नवीन योजनेचा शुभारंभ होण्याचा योग आहे. व्यवसायात यश मिळेल. अनेक नवीन संधी व नवीन मार्ग सापडतील. प्रवास आनंददायक होतील. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.
आज अपेक्षीत यश मिळणार नाही. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. जोडीदारा बरोबर मतभेद झाले तरी कोणतीही टोकाची भूमिका न घेतलेलीच बरी राहील. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. दिवस धावपळीचा राहील. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्या. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण कराल.
आज भाग्याची साथ लाभणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुमच्या प्रेमळ आणि मर्यादशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.अत्यंत अनुकुल दिवस आहे. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. कोणाचाही द्वेष तिरस्कार करू नका. नवीन योजना फायदेशीर ठरतील. सहकार्य लाभेल. कलाकारांना योग्य संधी मिळतील.
आज आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. विपरित परिणाम दिसतील. बँकेत कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. द्विधा मनस्थिती उद्भवेल. मोठे निर्णय घेऊ नयेत. व्यवहार करताना जपून करा. जोडीदारासोबत वैचारिक पातळीवर मतभेद होऊ शकतात.
आज नोकरीच्या संधी चालून येतील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. नकारात्मक विचार मात्र दूर ठेवा. खरेदी विक्री करिता आजचा दिवस फायदेशीर ठरेल. पदप्राप्ती मानसन्मान मिळेल. उर्जात्मक आणि उत्साही दिवस आहे.
आज नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. उतावीळपणावर आवर घालावा. स्पर्धेत यश मिळण्याची आज संधी आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. आर्थिक आवक वाढेल. कामात उत्साह वाटणार आहे. मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. प्रवास सुखकर व हितकारक ठरतील.
आज मनावरचा ताण वाढणाऱ्या गोष्टी घडतील. शेअर्समधील गुंतवणूक नुकसानकारक होईल. काही अप्रिय घटनेमुळे त्रास सहन करावा लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानी बाळगा. वाईट संगती पासून सावध राहा. घरातील मौल्यवान वस्तु गहाळ किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. व्यसनापासुन दुर राहा. कर्ज घेणे देणे टाळा.
आज घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. परंतु तुमच्या समतोल स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. तरूण तरुणीचे विवाह योग जुळतील. प्रेमप्रकरणात कुटुंबाच्या विरोधात जावून कठोर निर्णय घ्यावे लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.