मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 12 January 2024: पौष मासारंभ या राशींसाठी ठरेल फायद्याचा, प्रगतीच्या संधी! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 12 January 2024: पौष मासारंभ या राशींसाठी ठरेल फायद्याचा, प्रगतीच्या संधी! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 12, 2024 08:51 AM IST

Horoscope Today 12 January 2024: आज १२ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 12 January 2024
Horoscope Today 12 January 2024

आज शुक्रवार १२ जानेवारी रोजी, आज चंद्र प्लुटोशी संयोग करत सुर्याच्या नक्षत्रातुन संक्रमण करणार आहे. हर्षण आणि वज्र योगात चंद्रदर्शनाचा शुभ योग आहे. तसेच आज पौष मासारंभ होत असून, कसा जाईल आजचा शुक्रवारचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज तुम्ही दरारा निर्माण कराल. घरात अशांतता राहील. वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. खूप दिवसांपासून रखडलेली संधी मिळेल. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. आवडत्या व्यक्तीशी मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ होईल. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामंजस्य राहील. व्यापारात वृद्धी होऊन अनुकुल स्थिती राहील. वेळेचा चांगला उपयोग करा, कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग आहे. वडिलांच्या सहकार्याने व्यवसायातील अडचणी दूर होतील.

वृषभ: 

आज अडकलेले पैसे मिळतील. श्रमसाफल्याचा अनुभव घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. तापटपणावर आवर घाला. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबात सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नतीचा दिवस ठरेल. 

मिथुनः 

आज आपल्या मताशी ठाम राहाल.  लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल.  आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात असतील त्यासाठी कष्ट कराल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात वृद्धी होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जोडीदार नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत.

कर्क: 

आज तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. राजकारणींना नवीन युक्ती शोधावी लागेल. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. यंत्रावर काम करताना सांभाळून राहावे. थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. लढा देण्याची पात्रता अंगी बाळगाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. वातावरण ताण-तणावात्मक राहील. कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. मानसिक स्वास्थ राखा. शक्यतो आज प्रवास टाळावा.

सिंह: 

आज मताशी ठाम रहाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल. लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. नोकरीत नवीन संकल्पना मांडाल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

कन्या: 

आज संततीला योग्यवेळी समज द्यावी लागेल. आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

तूळ: 

आज थोडा त्रासच होणार आहे. कोणालाही जामीन राहू नये. दुसऱ्यांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांना तुमची ठाम मते पटणार नाहीत. तेथे वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडा उद्धटपणा आणि अतिशयोक्ती बोलणे आवरायला लागेल. विधायक गोष्टी कराल पण भांडखोरपणाने इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल. मन लावून काम करा. 

वृश्चिकः 

आज लांबच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नको तेथे खर्च झाल्यामुळे चिडचिड होईल. करिअरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. खोट्याचा किंवा नको त्या गोष्टीचा आधार मात्र घेऊ नका. आलेली संधी दार ठोठावून निघून जाऊ शकते. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. रागाचा अतिरेक टाळावा. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. जास्त मेहनत घ्यावी लागेल.

धनुः 

आज कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे राहाल.  दुसऱ्यांना आदर वाटेल. कामाचा दर्जा वाढेल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. कौटुंबिक सुखशांती राहील. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. राजकारणातील व्यक्तींना पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा लाभेल.

मकर: 

आज सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल. बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. आंनदाची बातमी मिळेल. मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

कुंभ: 

आज आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात कामगारांना कितीही सवलती दिल्या तरी त्यांच्या त्रासापासून सुटका मिळणार नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाडूंना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. प्रवास होईल.

मीनः 

आज व्यवसायात खूप काम कराल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळेल. त्यामुळे आनंदी उत्साही राहाल. नवीन संपत्ती घेण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. कौटुंबिक सुख-शांती मिळेल.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)