आज सोमवार १२ फेब्रुवारी रोजी, चंद्र शनि आणि गुरूच्या राशी तुन व नक्षत्रातूनही भ्रमण करीत आहे. दिनमानावर शनि आणि गुरूचा प्रभाव राहील. सिद्ध योगात कसा असेल सप्ताहातील पहिला दिवस! वाचा राशीभविष्य!
आज मोठे आर्थिक व्यवहार करू नयेत. थोडे आस्थिर आणि चंचल बनाल. मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाऊ शकतात. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. दिवसाच्या उत्तरार्धात प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. बायकोचा सल्ला कामी येईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल.
आज आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाण्याची शक्यता आहे. हप्ते वेळेवर फेडावे. रचनात्मक कामाकडे ओढ राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. कामाचा गाडा स्वत: ओढाल त्यामुळे थकवा जास्त जाणवेल. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. काळजीपूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढेल. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणारा दिवस आहे.
आज आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल.
आज व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. आजू बाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल.
आज हातात पैसा आल्यामुळे बरीच देणी देऊन टाकाल. जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. रोजगारात जबाबदारीनुसार काम करा. मन अशांत असल्याकारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. काही व्यवहार अनपेक्षित व नुकसानकारक ठरतील. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मन समाधानी राहणार नाही.
आज जास्त कष्ट घ्यावे लागले तरी पैसे मिळणार आहेत. कष्टाला पर्याय नसला तरी प्रगती करणार आहात. उत्साही आणि आनंदी असाल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. यश निश्चित लाभेल.
आज प्रचंड मेहनतीच्या मानाने मामुली यश मिळत असल्यामुळे थोडे निराशेकडे झुकाल. तज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवावे. गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास टाळा.
आज जोडीदाराच्या मनाचा विचार करावा लागेल. आर्थिक घडी बसेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. कलावंतांना उत्तम संधी व प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील.
आज नवीन प्रॉपर्टीसंबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. साहित्यिक क्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल.
आज नवीन आर्थिक गुंतवणूक कराल. खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. स्वतःच्या मताबरोबर इतरांचाही विचार करावा लागेल. वैवाहिक जीवनात कधी नव्हे ते जोडीदाराच्या मनासारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. संततीच्या मनाचा आदर केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होईल. त्यामुळे मुलेही खूष राहतील. मोठी आर्थिक फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
आज समाजात मान मिळेल. थोडासा ताणही येईल. नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल.
आज परिपूर्ण काम कराल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल.
संबंधित बातम्या