Horoscope Today 11 March 2024 : बालव करणात आणि शुभ योगात कसा फलद्रुप होईल सोमवार! वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 11 March 2024 : बालव करणात आणि शुभ योगात कसा फलद्रुप होईल सोमवार! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 11 March 2024 : बालव करणात आणि शुभ योगात कसा फलद्रुप होईल सोमवार! वाचा राशीभविष्य!

Mar 11, 2024 01:19 PM IST

Horoscope Today 11 march 2024: आज ११ मार्च २०२४ सोमवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

आजचे राशीभविष्य ११ मार्च २०२४
आजचे राशीभविष्य ११ मार्च २०२४

चंद्रदर्शनाचा शुभ योग आहे. चंद्र गुरूच्या राशीतुन आणि शनिच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार असून राहु , नेपच्युन या ग्रहांशी संयोग करीत आहेत. मेष ते मीन सर्व राशीच्या लोकांना कसा जाईल आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज अत्यंत महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होण्याचा योग आहे. कुंटुंबात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहील. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होऊ शकतो आणि वारसा हक्काचे प्रकरण मार्गी लागतील. 

वृषभः 

आज आर्थिक लाभाचा दिवस आहे. मान प्रतिष्ठा वाढेल. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. नोकरदारासाठी यशाचा दिवस असणार आहे. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्यही उत्तम राहील.

मिथुनः 

आज व्यापारात मोठे आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. अनावश्यक चिंते पासून दूर राहा. उत्पन्न वाढीचे योग आहे. बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. कामकाजात यश प्राप्त होईल. मान सन्मानात वाढ होईल. दिनमान शुभ दिवस आहे. नवीन रोजगारात यश संपादन होईल.

कर्कः

आज मनस्ताप करावा लागेल. व्यापारात अनपेक्षीत नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक बौद्धिक ताण वाढेल. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. प्रवास नुकसान कारक राहील. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात निराशाजनक वातावरण राहील.

सिंह: 

आज जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. आकस्मिक आर्थिक लाभ होतील.

कन्याः 

आज निर्णय अचूक ठरतील. चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्रमैत्रीणेचे सहकार्य लाभेल. मनोबल उंचावेल. प्रवासातुन लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे. शुभ कार्यात सहभागी व्हाल. 

तूळ: 

आज हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. नोकरीत कामात यश मिळेल. विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल व समृद्धी लाभेल. खर्चावर काहीसे नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक योग उत्तम आहे. देवधर्म आध्यात्मिक कार्य घडेल. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. 

वृश्चिकः 

आज उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढतील. मतभेद निर्माण होऊ शकतात. रोजगारात वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. दुःखद घटना ऐकायला मिळतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुर्घटना गंभीर दुखापततीची शक्यता आहे. दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे. रागावर नियंत्रण ठेवा. वादविवाद होण्याची शक्यता अधिक आहे. 

धनुः 

आज नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. अनपेक्षित आर्थिक लाभ संभवतो. धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. मित्रमैत्रिणी व जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. 

मकरः 

आज विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांवर लक्ष ठेवा. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. ताणतणावाची परिस्थिती निर्माण होईल. व्यवहारात सावध रहा. संततीच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्‌भवतील. खर्च वाढतील.

कुंभ: 

आज संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. उद्योग व्यापारात कामाचा व्याप आणि विस्तार वाढेल. नवीन प्रकल्प आणि प्रस्ताव येतील. यश निश्चित लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधात स्नेह वाढेल. मानसिक स्वास्थ लाभेल.

मीनः 

आज कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. रोजगारात यश मिळेल. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. संततीकडून शुभवार्ता समजतील. प्रगती होईल.

Whats_app_banner