Horoscope Today 11 January 2024: संभ्रमात पडाल, अमावस्या शुभ ठरेल की अशुभ! वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 11 January 2024: संभ्रमात पडाल, अमावस्या शुभ ठरेल की अशुभ! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 11 January 2024: संभ्रमात पडाल, अमावस्या शुभ ठरेल की अशुभ! वाचा राशीभविष्य!

Jan 11, 2024 08:25 AM IST

Horoscope Today 11 January 2024: आज ११ जानेवारी २०२४ गुरुवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

horoscope 11 january 2024
horoscope 11 january 2024

आज गुरुवार ११ जानेवारी रोजी, चंद्र धनु राशीच संक्रमण करेल. शुक्राच्या नक्षत्रातुन चंद्रभ्रमण होत असुन दर्श अमावस्येचा कोणत्या राशींना लाभ होणार आहे! व्याघात योगाचा कसा प्रभाव राहील! मेष ते मीन राशींचे वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. कामाची पोचपावती तुम्हाला मिळेल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अंगावर घेऊन पार पाडा आणि दाखवून द्या. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. मनातील योजना पार पाडाल, तशी आर्थिक तरतूद होईल. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. उत्तम साथ लाभेल. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढेल. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबापासुन वेगळे राहण्याचे प्रसंग येतील.

वृषभ: 

आज कामाच्या पद्धतीत बदल कराल. गोड बोलण्यावर भर ठेवाल. तुम्ही स्वत: ज्या गोष्टींचे चिंतन कराल व त्यातून फायदे मिळवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. उच्च शिक्षणात जास्त लक्ष द्याल. आनंददायी वातावरण राहील. निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत.

मिथुन: 

आज नोकरीत योग्य संधी न मिळाल्यामुळे संभ्रमात पडाल. येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी विचार कराल. घरातील लोकांना तुमचे विचार योग्य तऱ्हेने पटवून द्याल. कामाला जास्त महत्त्व द्याल. सकारात्मक झालात तर कामे पुढे जातील. मनावरचा ताण कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगलं सहकार्य मिळेल, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. प्रकृतीत सुधारणा होईल. 

कर्क: 

आज उत्साह अंगी संचारेल. भाग्याची साथ चांगली मिळेल. उद्दीष्ट पूर्ण कराल. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. उत्साहाचे व आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. उतावीळपणावर आवर घालावा. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.

सिंह: 

आज जोडीदाराशी वाद होऊ शकतो. थोडी निराशा वादी प्रवृत्ती राहील. करिअरमध्ये मेहनत घ्यावी लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. मालमत्तेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोर्ट-कचेरीच्या कामामध्ये अडचणी वाढतील. अहंकारी वृत्तीचा त्याग करा. माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. फसवणूक संभवते. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. गुप्त शत्रू डोके वर काढतील. आर्थिक बाबतीत नुकसान होऊ शकते. 

कन्या: 

आज पैश्याला अनेक वाटा फुटतील. जवळच्या लोकांची मने दुखावतील. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. तुमचा मुडचा भरवसा राहणार नाही. मनात उदासिनता वाढेल. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. जोडीदाराच्या आरोग्याची तक्रारी चिंताग्रस्त करीृतील. आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. कोणतेही काम अंगावर घेऊ नका. नाहीतर कठीण प्रसंगाशी झगडावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. मनाविरुद्ध कार्य घडतील.

तूळ: 

आज कुटुंबातील नातेवाईकांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्रस्त व्हाल. नियोजन झाकून कार्य करावे. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील. मनोधैर्य सांभाळा. विचारपूर्वक निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. कार्यक्षेत्रात गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. शांत चित्त राहण्याचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. गुंतवणुक करू नका. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. आरोग्याच्या तक्रारी असतील.

वृश्चिक: 

आजचा समस्यांना संयमाने तोंड द्याल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या नवीन योजनांना दाद मिळेल. परदेशगमनाच्या संधी मिळतील. धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील. कार्यक्षेत्रात काम करण्याचा उत्साह वाढेल. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. नातेवाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्यासारख्या घटना घडतील. मन प्रसन्न नसेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्चाने मन व्यथित होईल. चिडचिडेपणा वाढेल. प्रवासाच टाळा. जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या.

धनु: 

आज उलाढाल करत राहाल. मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. प्रवासात काळजी घ्या. नशिबाची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील. प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी असाल. मोठ्या लोकांशी पटणार नाही. वाहन किंवा घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. उद्योग तेजीत राहील. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अभ्यासात प्रगती कराल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पना शक्ती यात सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 

मकर: 

आज नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. या कामांना न्याय देण्यासाठी खूप मेहनत कराल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. शैक्षणिक क्षेत्रात विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. प्रयत्नांना यश मिळेल.

कुंभ: 

आज फायद्याचे वाढेल. आत्मविश्वासामुळे अडचणी सोडवाल. तरुण वर्गात नवीन ओळखी होतील आणि त्याचे रुपांतर प्रेमात होऊ शकेल. धाडस करताना मनाशी काही आडाखे निश्चित बांधाल. घरासंबंधी समस्या होऊ शकते. मौल्यवान वस्तु चोरीला जाण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. दिवस नुकसानदायक राहू शकतो. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या.

मीन: 

आज नोकरीत थोडा दूरदर्शी पणा ठेऊन त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कोर्ट-कचेरीची कामे रखडू शकतात. प्रकृती कडे दूर्लक्ष करून चालणार नाही. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. मित्र मैत्रिणींकडून चांगली साथ लाभणार नाही. नवनविन प्रलोभने येत राहतील. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करणे गरजेचेआहे. आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. अभ्यासात अडथळे निर्माण होतील. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

Whats_app_banner