मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 11 february 2024: आज मंगलमय दिवस, आर्थिक ओढाताण संपेल! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 11 february 2024: आज मंगलमय दिवस, आर्थिक ओढाताण संपेल! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 11, 2024 09:55 AM IST

Horoscope Today 11 february 2024: आज ११ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today horoscope 11 february 2024
Today horoscope 11 february 2024

आज रविवार ११ फेब्रुवारी रोजी, चंद्र राहुच्या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. चंद्रदर्शनचा देखील योग आहे. परिघ आणि शिव योगात कसा असेल सुट्टीचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज शुभ कामासाठी मंगलमय दिवस आहे. घरातील वाद संपतील व गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. पण वेळीच सावध राहयला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवासाचे योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्तम मोबदला मिळू शकतो. 

वृषभः 

आज अडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. अध्यापनामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. अहंकार टाळावा. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. मन प्रसन्न राहील.

मिथुनः 

आज कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. मोठा आर्थिक लाभ व प्रगती होईल. मनासारख्या घटना घडतील.

कर्कः 

आज आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासात जास्त लक्ष घालावे लागेल. तापटपणा वाढेल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. प्रतिभेस वाव मिळेल. नावलौकिक वाढेल. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. 

सिंहः 

आज वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. मनस्ताप करावा लागेल. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. 

कन्याः 

आज काही महत्त्वाची कामे रखडतील. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा करू नये. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. मनोबल विचलित होऊ शकते. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. प्रवास शक्यतो टाळा.  व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका.

तूळ: 

आज कामात मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत. कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल.  कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. यशस्वी दिवस आहे.

वृश्चिकः 

आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत राहणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. कुटुंबावर खर्च होईल. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल.

धनुः 

आज दुर्मिळ गोष्टींचा संग्रह कराल. झोपेची तक्रार राहील. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होऊ शकते. 

मकरः 

आज जुनी येणी वसूल होतील. यश मिळणार असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. मनावर थोडा ताण येईल. अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक होऊ शकते.

कुंभः 

आज घरातील अनेक अडचणी सोडवाल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. घरगुती वातावरण चांगले राहील. धाडसी निर्णय घ्याल. 

मीनः 

आज काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ ठरतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. आज कर्ज घेणे देणे टाळा.