मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 10 January 2024: भरभराटीचा दिवस, वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 10 January 2024: भरभराटीचा दिवस, वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 10, 2024 08:38 AM IST

Horoscope Today 10 January 2024: आज १० जानेवारी २०२४ बुधवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

horoscope today 10 January 2024
horoscope today 10 January 2024

आज बुधवार १० जानेवारी रोजी, चंद्र धनु राशीच संक्रमण करेल, तसेच, रवि-मंगळ-बुध या तिन ग्रहांशी युती करणार आहे. ध्रुव योगात कसा असेल आजचा दिवस! मेष ते मीन सर्व राशींचे वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होईल. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनेक जणांचे सल्लागार बनाल. मानसिक अवस्था उत्तम राहील. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान-सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभराटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. व्यवहारिक समस्या दूर होतील.

वृषभ: 

आज व्यक्तीत्वामध्ये सुधारणा करावी असे वाटेल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिवस आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. 

मिथुन: 

आज प्रतिकूल दिवस आहे. आर्थिक स्थिती थोडी अस्थिर होईल जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. तुमच्या प्रेमळ स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. मानसिक त्रास होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. प्रवास नुकसानकारक राहील.

कर्क: 

आज कलाकारांच्या कलेला वाव मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील, परंतु  लगेच यश मिळेल अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. कार्यक्षेत्रात बदल किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. दुरवरचे प्रवास घडतील.

सिंह: 

आज कष्टाचे चीज होईल. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत नको ते धाडस दाखवू नये. तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. मन प्रसन्न होऊन जाईल. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान-सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात व कौटुंबिक बाबतीत बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. वाद निर्माण होऊ शकतात. उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल.

कन्याः 

आज विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. अडलेली कामे मार्गी लागतील. ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदय कारक दिवस आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर कौतुकास पात्र ठराल.

तूळ: 

आज कर्ज हवे असणारांना त्याची तरतूद करता येईल. फक्त अंथरूण पाहून पाय पसरावे. एखादी घटना अचानक घडेल. मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल आणि याची नोंद नक्कीच सगळीकडे घेतली जाईल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसान होण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.

वृश्चिकः 

आज जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुमची निरीक्षणक्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर योग्य रितीने कराल तर बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे, नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. संपादन क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील.

धनु: 

आज दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. रात्रीचे जागरण टाळा. घरातील खर्च वाढतील. कोणतेही निर्णय घाईत घेऊ नयेत. तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहील. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.

मकर: 

आज कलाकारांची कला बहरेल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. कामातील बदल काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असे नाही. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. उधारी वसूल होईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. बोलण्यातील संभ्रम मात्र दूर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल.

कुंभ: 

आज उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा मानसन्मानात वाढेल. प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. लाभ होईल.

मीन: 

आज विचारपूर्वक निर्णय घ्या. थोडी संघर्षात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. आजाराला तोंड द्यावे लागेल. घरात ताणतणाव जाणवेल. युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहील. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. 

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)