मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope today 10 December 2023: गजकेसरी योगाच्या प्रभावात 'या' राशींची आज होणार भरभराट; वाचा राशिभविष्य!

Horoscope today 10 December 2023: गजकेसरी योगाच्या प्रभावात 'या' राशींची आज होणार भरभराट; वाचा राशिभविष्य!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 10, 2023 06:37 AM IST

Rashi Bhavishya Today 10 December 2023: आज शनिचा विशेष प्रभाव राहणार आहे. आज शनिवार आणि शनिदेव वक्री अवस्थेतुन मार्गी होत आहेत. शनिचा प्रभाव असणाऱ्या व्यक्तींना आज शनिची उपासना फलदायी ठरणार आहे. आपल्या राशींवर मार्गी शनिचा काय परिणाम होईल हे पाहुयात! वाचा राशीभविष्य!

Today horoscope
Today horoscope

मेष : आजचा दिवस चांगला आहे. गजकेसरी योगाच्या प्रभावात आज जी कामे हाती घ्याल त्यात यश मिळेल. आज खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक योग आहे. नव्या योजनांवर काम करा. नोकरी आणि व्यवसायात भरभराट होईल. तसेच बढती देखील मिळेल. आर्थिक भरभराटीचा दिवस आहे.

वृषभ : आजचा दिवस अनुकूल आहे. शुभ चंद्र भ्रमणात जी कामे हाती घ्याल ती पूर्ण होईल. व्यापारात जे प्रकल्प हाती घ्याल ते यशस्वी होतील. नोकरीमध्ये केलेल्या कामामुळे वरिष्ठ कौतुक करतील. औद्योगिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

मिथुन : आज दिनमान प्रतिकूल आहे. कामाच्या ठिकाणी आणि व्यापारात अडचणी येतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही मेहनत करून देखील त्याचे श्रेय दुसर्‍याला मिळेल. व्यापारी वर्गाांनी मोठे निर्णय आज घेणे टाळावे. तसेच मोठे आर्थिक व्यवहार देखील टाळावे. गुप्त शत्रू त्रास देणार आहेत. प्रेम प्रकरणात अडचणी येतील.

कर्क : आज प्रतिकूल ग्रहमान आहे. चंद्रबल क्षीण असल्याने कामाच्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे. आज जास्त बोलणे टाळा. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल. भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत दुसऱ्यावर विश्वास ठेवणे टाळा. गुप्त शत्रुकडून तुमच्या वाटेत अडचणी निर्माण होतील.

सिंह : आजचा दिवस प्रतिकूल आहे. चंद्रबल अनिष्ट परिणाम देणारे असल्याने काळजी घ्यावी लागणार आहे. गुप्तशत्रू त्रास देतील. कायद्याच्या कचाट्यात अडकाल. व्यवसायिकांना आर्थिक अडचणी येतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. आज दुरवरचे प्रवास टाळा. अपघाताची शक्यता आहे.

कन्या : आज दिनमान अनुकूल आहे. चंद्रबल लाभल्याने तुमच्या हातून शुभ कामे होतील. व्यापारात आर्थिक भरभराट होईल. व्यवसायाचे नवे प्रस्ताव येतील. मोठे आर्थिक लाभ होतील. दुरवरचे प्रवास आर्थिक लाभ देणारे ठरतील.

तुला : आज चंद्रभ्रमण आणि ग्रहमान अनुकुल आहे. नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित लाभ मिळतील. घरचे वातावरण चांगले राहील. मनोधैर्य उंचावेल. जुनी देणी मिळतील. दूरच्या प्रवासातून आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक: आजचा दिवस चांगला आहे. चंद्र-गुरू प्रतियोगात आर्थिक लभाचे योग आहेत. व्यापारात आणि नोकरीच्या ठिकाणी नवे प्रकल्प हाती घ्याल. आज मोठे आर्थिक व्यवहार होतील. वाडीलोपार्जित संपत्तीत वाटा मिळेल. कामानिमित्त दूरचे प्रवास होतील.

धनु : आजचा दिवस चांगला आहे. चंद्राची स्थिती लक्षात घेता व्यापाराचा विस्तार होईल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मकर : आजचा दिवस चांगला आहे. ग्रहमान अनुकूल आहेत. रोजगारात आर्थिक लाभ होतील. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. जुनी येतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. लग्नाचा योग आहे. घर आणि वाहन खरेदीचा योग आहे.

कुंभ : आज ग्रहयोग अनिष्ट स्थानात आहे. दिनमान अनिष्टकारक आहे. जी कामे हाती घ्याल त्यात अडथळे येतील. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. शत्रुपक्ष वरचढ राहिल. प्रेमात अडथळे येतील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. अपघात होण्याची शक्यता आहे.

मीन : चंद्र-गुरू युती आणि भाग्यातील ग्रहयोगात आज नवीन प्रकल्प हाती घ्याल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखाल. त्यांच्याकडून मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील. रोजगारात नवीन योजना राबवाल. व्यवसायात आर्थिक भरभराट होणार आहे.