आज चंद्र अहोरात्र गुरू,राहुच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे.ध्रुव आणि व्याघात योग असा दुहेरी शुभ योग आहे. कसा जाईल महिन्यातील पहिला शुक्रवार! वाचा राशीभविष्य!
आज घरासंबंधी समस्या सुटतील. वाचन लिखाण करायला सवड मिळेल. कोणत्याही परिस्थिती वर मात करू शकाल. नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागतच होईल. स्पर्धक फायदा घेतील. शेअर बाजार आणि विमामुळे लाभ होतील. अचानक मालमत्ता खरेदी घडेल. दुरचे प्रवासाचे योग आहेत.
आज कुटुंबात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या तरी त्या कर्तव्यनिष्ठेने पार पाडाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जीने कष्ट घेतले तरच मनाजोगे यश मिळेल. व्यापारात भांडवलाचे प्रश्न मिटतील. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत.
आज उद्योग तेजीत राहील. मानसिक स्वास्थ्य मिळेल. केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरेल. नवीन प्रकल्प हाती येतील. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. बंधुप्रेम मिळेल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. कला गुणांना वाव मिळेल. मनातील इच्छित काम मार्गी लागतील.
आज आत्मविश्वास आणि उत्साह कमी राहिल्यामुळे त्याचा कामावर परिणाम होईल. आर्थिक बाबतीत मोठे व्यवहार टाळावेत. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. गैरसमज आणि संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. कर्जप्रकरण व धाडसी निर्णय आज टाळा.
आज ध्येयावर प्रेम कराल. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल. व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. नव्या खरेदीने कुटुंबात आंनदी वातावरण राहील. धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल.
आज कामाची सुरुवात चांगली होईल. कष्टाने का होईना जूनी येणी वसूल होतील. त्यामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल. साहसी वृत्ती वाढेल. आर्थिक प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील. व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मोठे यश प्राप्त होईल. अल्पकालीन गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते.
आज पैसा खर्च करण्यात लहरीपणा जाणवेल. कुठेही धोका पत्करण्याची तयारी ठेवाल. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पर्धकांवर मात कराल. मनाप्रमाणे घटना घडतील. व्यवसायात उत्तम लाभ होतील. मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील.
आज घरामध्ये थोडे संघर्षात्मक वातावरण राहिले तरी तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास गोष्टी टोकापर्यंत जाणार नाही. मन:शांती ढळू देऊ नका. विरोधक आक्रमक होऊ शकतात. शेअर्समधील मोठी गुंतवणूक टाळावी. काळजीपूर्वक व्यवहार करा. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्याला मिळेल असी स्थिती आहे. आर्थिक हानी होऊ शकते.
आज मानसिक स्वास्थ उत्तम राहील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. धार्मिक वृत्ती राहील. काही लाभदायक गोष्टीही घडतील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवाल. आत्मविश्वासही वाढेल. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. रोजगारात समाधानकारक स्थिती राहील. मित्र किवा सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. घरातील अडचणी दूर होतील.
आज दिवसभर मन प्रसन्न राहील. नोकरीतील बदल फायदेशीर ठरतील. प्रसिद्धीच्या झोतात येण्याची संधी मिळेल. आपली प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. कौतुक होईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. उत्तम दिवस आहे. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढणार आहे.
आज मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. मनाचा गोंधळ उडेल. काही घरगुती गोष्टींमुळे अस्वस्थता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. नैराश्यामुळे चिडचिड निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल.आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
आज आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. कलाकारांना चांगल्या संधी मिळून त्यांच्या कलेचे चीज होईल. भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. फायदेशीर प्रवास होऊ शकतो. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे.
संबंधित बातम्या