आज १ जानेवारी रोजी नववर्ष २०२४ प्रारंभ होत असून, सोमवार आहे.चंद्र शुक्राच्या प्रभावात सिंह राशीत राहणार आहे. आयुष्यमान योगात कसा असेल नववर्षातील पहिलाच दिवस! वाचा राशीभविष्य!
आज अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढेल. संकुचित मनोवृत्ती टाळा. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. व्यापार व्यवसायात प्रगतीसाठी काय करावे याचा खोलवर अभ्यास करा. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील. नोकरी व्यवसायात सरकारी कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. सवलती मिळवायच्या असतील तर त्या मिळून जातील. साहसी वृत्ती वाढेल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहील. आपल्या व्यसनांवर आवर घाला. कुटंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. अचानक लाभ होईल.
आज घरामध्ये एखाद्याच्या आजारपणासाठी पैसा खर्च होऊ शकतो. संततीच्या बाबतीत दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. वाईट सवयीचा त्याग करा. नोकरीत प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. आपणास कठोर भुमिकेत राहावं लागेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहील. आपल्या महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. सकारात्मक विचार ठेवा. तुमच्या साध्या स्वभावाचा कोणी गैरफायदा घेऊ शकते.
आज रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. परदेशगमनाचे योग आहेत. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. प्रबळ आत्मविश्वास आणि परिस्थितीचा अचूक अंदाज तुमच्या कामाचा दर्जा सुधारून टाकेल. मुलांसाठी जरा जास्त लक्ष द्यावे लागे. दोन पिढ्यांनी समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. आहारावर नियंत्रण ठेवा. पदोन्नती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे.
आज गृहस्थी सौख्य लाभेल. आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. व्यापारात अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यापारात स्पर्धकांच्या चुकीचा नकळत फायदा होईल. अत्यंत लाभ दायक दिवस असेल. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. रोजगारात मात्र प्रतिस्पर्धी डोईजड होतील. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. शासकीय योजनेतून लाभ घडेल. आरोग्य उत्तम राहील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. नोकरीत अपेक्षेप्रमाणे पदोन्नती व बदली होण्याचे योग आहेत. कुटुंबात मनमानी करू नका. विनाकारण वाद घालू नका.
आज स्थावर संपत्तीबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी होतील. त्यातून फायद्याची शक्यता आहे. आकस्मिक धनलाभ होतील. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नंतर परिस्थिती सुधारल्यानंतर निर्णय घ्यावा. आर्थिक लाभ मिळतील त्यासाठी संबंधीत व्यक्तींशी संपर्क साधल्यास कामे मार्गी लागतील. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा.
आज वैवाहिक जीवनात आंनदी वातावरण राहिल. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून लाभ होईल. अचानक लाभ होतील. प्रवास लाभकारी ठरतील. परदेशभ्रमणाचे योग आहेत. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाह इच्छूकांना आपला साथीदार निवडण्याची संधी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीकडे वाटचाल कराल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात नवीन योजना कायदेशीर ठरतील. आर्थिक खर्चाचा ताळमेळ ठेवा. नोकरीत तणाव मुक्त झाल्याने मन समाधानी राहील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची आरोग्याची तक्रार निर्माण होईल. तापट स्वभावावर आवर घाला नाहीतर नुकसान होईल.
आज व्यवसायात आर्थिक व्यवहारात सावध रहा. कुटुंबातील सदस्यांसोबत वादविदाचे प्रसंग टाळा. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. कलाक्षेत्रात केलेल्या कामाचे चीज होणार नाही. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्भवतील. आपणास नोकरीत तणावमय परिस्थिती उद्भभवण्याची शक्यता आहे. व्यवसायात नुसते ज्ञान असून चालणार नाही तर ते कोणत्या पद्धतीने वापरावे याचाही अभ्यास करावा लागेल. वाहन चालविताना खबरदारी घ्यावी. शक्यतो प्रवास टाळा. शत्रुपक्ष वरचढ होतील. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. खर्चामुळे चिंतीत राहाल. खर्चामध्ये वाढ होईल. तुमच्या कोणत्याही कामात जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील.
आज उधारी वसुली होईल. नव्या संधीचा फायदा होईल. प्रेमप्रकरणातील संबंध दृढ होतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. मित्रांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहिल. आरोग्य ठीक राहणार आहे. राहणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्च कराल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी मिळतील. काम करून घेण्यावर भर राहील. आर्थिक बाबतीत मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासातुन आर्थिक फायदा होईल. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. नोकरीत जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या पद्धतीत बदल केला तर फायदेशीर ठरेल. व्यापारात आर्थिक स्थिती चांगली राहील. कार्यक्षेत्रात विस्तार होईल.
आजचं चंद्रभ्रमण शुभ असल्याने नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत अधिकार मिळेल. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे सफल होतील. जुनी येणी बसूल होतील. आपल्या कार्य क्षेत्रात आपल्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. नवीन वस्तु खरेदीकडे मन झुकेल. आपल्या कार्य पद्धतीत बदल फायदा होईल. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. मुलाची प्रगती आपल्याला आनंद देईल. व्यापार रोजगारात अपेक्षे प्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. विदेश भ्रमणाचा योग आहे. आरोग्य उत्तम राहील.
आज अनुकूल ग्रहयुतीत रोजगारात कामातील योग्य बदल आकर्षक ठरतील. अती संवेदनशील स्वभावामुळे प्रत्येक गोष्टीचा उगाचच विचार करीत रहाल. अध्यात्मिक उन्नती साधाल. तुमची वृत्ती आनंदी राहील. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल. रोजगारात सहकार्य करणारे नवे मित्र समोर येतील. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संबंधाचा फायदा उचला. व्यापारात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती संतोषजनक राहिल. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. आपल्या पराक्रमामुळे समाजात व कुटुंबात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे.
आज अनुकूल ग्रहयुतीमुळे नोकरदारास स्नेहपूर्वक वातावरण अनुभवता येईल. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. घरातील मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. कारण नसताना काळजी करण्याचा स्वभाव बनेल. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील. परंतु खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला असेल. व्यापारिक प्रकरणात जवाबदारी वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नवीन संप्पत्ती खरेदीचा योग आहे. आर्थिक बाबतीत मध्यम स्वरुपाचा दिवस आहे. शेअर्स मधील गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिणीत आर्थिक व्यवहार टाळावेत. विद्यार्थ्यानी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. सामाजिक कार्यामुळे आपल्या नावलौकिकेत वाढ होईल.
आज व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील गोष्टी लवकरच पूर्ण होईल. व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. लाबच्या प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये प्रकृती व चीजवस्तूंची काळजी घ्यावी. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. वाईट सवयीचा त्याग करा. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. ताणतणाव वाढल्याने मन व्यथित होईल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे.