ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होतात. ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतात. ग्रहांच्या राशीपरिवर्तनालाच गोचर असे म्हटले जाते. दरम्यान आज मंगळवार २ जुलै २०२४ रोजी चंद्र कृतिका नक्षत्रातून वृषभ राशीत भ्रमण करणार आहे. या चंद्रभ्रमणातून आज विविध योग निर्माण होत आहेत. यामध्ये आज शशी राजयोग आणि गजकेसरी योगांचा समावेश आहे. गजकेसरी योगात कोणत्या राशींना फायदा होणार आणि कोणत्या राशी नशीबवान ठरणार ते आपण जाणून घेऊया.
आज गजकेसरी योगात ग्रहमान अनुकुल असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन प्रॉपर्टीसंबंधी विचार चालले असतील तर ते प्रत्यक्षात उतरतील. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायची संधी मिळेल. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात चांगला जम बसेल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.
गजकेसरी योगाचा लाभ वृश्चिक राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. याकाळात कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती होईल. बेरोजगारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल.
गजकेसरी योगात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. बरीच रखडलेली कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. भविष्यातसुद्धा ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. व्यवसाय वेगाने विस्तारेल. महत्वाच्या मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल.
मीन राशीच्या लोकांना गजकेसरी योगात लाभ मिळेल. याकाळात आई-वडील आणि गुरुजींची सेवा करण्याची संधी मिळेल आणि धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. कुटुंबात काही वाद सुरू असतील तर ते आज संपुष्टात येतील. घरात सुखसमृद्धी आणि शांतता नांदेल. आज नोकरदार वर्गासाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावही वाढेल. येत्या काळात बढती किंवा पगारवाढीचा योग आहे. पैसे आल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल.