Shani Gochar : अनपेक्षित धनलाभ ते नोकरीत प्रमोशन! 'या' राशींना शनीदेव देणार कष्टाचे फळ
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shani Gochar : अनपेक्षित धनलाभ ते नोकरीत प्रमोशन! 'या' राशींना शनीदेव देणार कष्टाचे फळ

Shani Gochar : अनपेक्षित धनलाभ ते नोकरीत प्रमोशन! 'या' राशींना शनीदेव देणार कष्टाचे फळ

Published Jun 30, 2024 11:59 AM IST

Shani Gochar Auspicious Yog : शनीच्या शुभ कृपेने मिथुनसह ३ राशींच्या लोकांना नोकरीत प्रमोशन, आर्थिक स्थैर्य ते वैवाहिक सुख अशा अनेक गोष्टींमध्ये लाभ मिळणार आहे.

shani rashi parivartan
shani rashi parivartan

जुलै महिन्याला प्रारंभ होणार आहे. नवीन महिना बऱ्याच नवीन ज्योतिषीय घडामोडी घेऊन येणार आहे. या महिन्यात अनेक मोठमोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर होतो. कधीकधी हे ग्रह आपली वक्री चाल चालतात. शनीदेवसुद्धा आपली वक्री चाल चालणार आहेत. शनीची वक्री चाल काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात काही राशींना शनी देवाची शुभ कृपा दृष्टी लाभणार आहे. शनीच्या शुभ कृपेने या राशींच्या आयुष्यात नोकरीत प्रमोशन, आर्थिक स्थैर्य ते वैवाहिक सुख अशा अनेक गोष्टींमध्ये लाभ मिळणार आहे. पाहूया त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.

मिथुन

जुलै महिन्याचा पहिला आठवडा मिथुन राशीसाठी अगदी उत्तम असणार आहे. या राशीच्या लोकांना शनीदेवाची शुभ कृपादृष्टी लाभणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल. सामाजिक कार्यात आवर्जून सहभाग घ्याल. त्यातून मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला एक नवी ओळख मिळेल. आकस्मिक धनलाभ होऊन हातात पैसा येईल. आर्थिक स्थिती भक्कम राहील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळण्याचा योग आहे. व्यवसायिकांना गुंतवणुकीतून लाभ होईल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसुद्धा शनीदेवाच्या शुभ कृपादृष्टीचा फायदा मिळणार आहे. शनिदेवाच्या कृपेने हा आठवडा तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे. उद्योग-व्यापारात नवे प्रोजेक्ट पदरात पडतील. भविष्यात त्यातून मोठा आर्थिक फायदा होईल. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढेल. महत्वाच्या कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल. अनपेक्षितपणे धनलाभ होतील. शिवाय उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने मन प्रसन्न राहील. शनीदेवाच्या शुभ कृपेने काहींना नोकरीत प्रमोशन मिळण्याचा योग आहे. शिवाय ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते.

कन्या

शनी देवाच्या शुभ कृपेचा लाभ कन्या राशीलासुद्धा मिळणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन करण्याची संधी मिळाले. तुमचे सुप्त कलागुण सर्वांसमोर येतील. त्यातून मानसन्मान वाढेल. सामाजिक क्षेत्रात असलेल्या ओळखींचा फायदा तुम्हाला होईल. बेरोजगारांनां नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विदेशात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांना हा काळ अनुकूल आहे. तुमची इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. घरात लक्ष्मी आल्याने मनःशांतीसुद्धा लाभेल.

Whats_app_banner