शास्त्रानुसार हिंदू धर्मात राशींना प्रचंड महत्व आहे. राशींच्या आधारे त्या त्या व्यक्तीची वेळ,काळ, भविष्य यांचा अंदाज लावला जातो. इतकंच नव्हे तर राशीवरून एखाद्या व्यक्तीचा स्वभावसुद्धा सांगितला जातो. हिंदू धर्मात मुला-मुलींचे विवाह जुळवताना राशींचा आधार घेतला जातो. त्या दोघांची जोडी कशी असणार? त्यांना वैवाहिक सुख लाभणार का? याचा अंदाज राशींवरून लावण्याचा प्रयत्न केला जातो.
राशीचक्रात तब्बल १२ राशी असतात. प्रत्येक राशींवर ग्रह-नक्षत्रांच्या स्थानबदलांचा परिणाम होत असतो. त्यांच्या सहाय्याने राशीचे भविष्य ठरवले जाते. परंतु बहुतांश लोकांना आपली राशीच माहिती नसते. अशावेळी लोक गोंधळून जातात. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरुन रास कशी ओळखावी हे सांगणार आहोत.
राशीचक्रातील पहिली राशी म्हणून मेष राशीला ओळखले जाते. ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर अ, चु, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, असते त्यांची राशी मेष असते. मेष राशीचे चिन्ह 'मेंढी' असते. या राशीच्या लोकांसाठी ९ हा मूलांक अतिशय शुभ असतो.
ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ओ, औ, इ, उ, ए, ऐ, वा, व, वी, वि, वु, वू, वे, वं, ई, ऊ असे असते त्यांचा समावेश वृषभ राशीमध्ये होतो. या राशीच्या लोकांसाठी ६ हा अंक अतिशय शुभ असतो. या राशीचे चिन्ह बैलासमान एक प्राणी असतो.
नावाचे पहिले अक्षर क, कृ, का, कि, की, कु, कू, घ, घृ, घा, ड, छ, छा, के, कौ, ह, हा असे असते त्यांची राशी मिथुन असते. या राशीसाठी ५ हा अंक लाभदायक असतो. स्त्री-पुरुष आलिंगबन्ध असे या राशीचे एकंदरीत चिन्ह असते.
शास्त्रानुसार ज्या लोकांचे नाव हि, हि, हु, हू, हे, हो, ड, डा, डि, डी, ड्, डू, डे, डो, डॉ या मुळाक्षराने सुरु होते त्यांची राशी कर्क असते. या राशींच्या लोकांसाठी २ हा अंक शुभ समजला जातो. या राशीसाठी खेकडा हा चिन्ह असतो.
ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर म, मृ, मा, मि, मी, मू, मे, मो, ट, टा, ट्र, टि, टी, ट्री, टे, ट्रे, टै, टौ, ट्रा हे असते त्यांचा समावेश सिंह राशीमध्ये होतो. या राशीच्या लोकांसाठी १ हा अंक शुभ समजला जातो. या राशीचे सिंह हे चिन्ह असते.
ढो, टो, ट्रो, प, पा, पृ, प्र, पि, प्रि, प्री, पी, पु, पू, ष, ण, ठ, पे, प्रे, प्रो, या अक्षराने ज्या लोकांचे नाव सुरु होते त्यांची राशी कन्या असते. या राशीच्या लोकांसाठी ५ हा अंक लाभदायक असतो. तर कन्या हेच या राशीचे चिन्ह असते.
ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर र, रा, ऋ, री, रि, रु. रू, रे, रो, त, ता, तृ, त्रा, ति, ती, तु, तू, ते असे असते त्यांची राशी तूळ असते. तूळ राशीच्या लोकांसाठी ७ हा अंक शुभ समजला जातो. या राशीचे चिन्ह तराजू असते.
तो न ना नृ नि नी नुनू नो नौ य या यी यू या मुळाक्षराने ज्या लोकांच्या नावाची सुरुवात होते त्यांची राशी वृश्चिक असते. वृश्चिक राशीसाठी ९ हा अंक शुभ असतो. राशीचक्रात या राशीसाठी विंचू हे चिन्ह असते.
ज्या लोकांच्या नावाची सुरुवात ये यो भ भा भे भा भृ भृं धृ ध धा धि धी ढा फा फ्र फ्रैं फि फूं फुं या मुळाक्षराने होते त्यांची राशी धनु असते. धनु या राशीच्या लोकांसाठी ३ हा अंक अतिशय लाभदायक असतो. धनुष्य उचलेला मनुष्य असे या राशीचे चिन्ह असते.
भो ज जा जी ख खा खि खी खे खो खु ग गा ग्र गृ गी ग्रीं गि गं या मुळाक्षराने ज्या लोकांच्या नावाची सुरुवात होते त्यांची राशी मकर असल्याचे समजले जाते. मकर राशीसाठी 8 हा अंक अतिशय शुभ असतो. मगरसारखा दिसणारा प्राणी या राशीचे चिन्ह आहे.
गु गू गे ग्रे गो स सृ स्त्र सा श श्र श्रे श्री श्री सु सू से सो शो द दू दा या अक्षराने ज्यांच्या नावाची सुरुवात होते त्यांची राशी कुंभ असते. कुंभ राशीच्या लोकांसाठी 8 हा अंक शुभ असतो. घड्यासारखी वस्तू या राशीचे चिन्ह असते.
दी ची दि दु दू थ था थ्र झ झं झा झि झी त्र दे द्रे द्रो दो च चा चं या अक्षराने ज्या लोकांच्या नावाची सुरुवात होते त्यांची राशी मीन असते. मीन राशीसाठी 3 हा अंक अनुकूल समजला जातो. मासोळी हे या राशीचे चिन्ह असते.