ज्योतिष शास्त्रानुसार राशीचक्रात तब्बल १२ राशी असतात. या प्रत्येक राशी ग्रहांच्या हालचालींनुसार कार्यरत असतात. बहुतांश लोकांना सकाळी उठल्यानंतर दैनंदिन राशीभविष्य पाहण्याची सवय असते. अनेकजण राशीभविष्य पाहूनच प्रत्येक कार्याची सांगड घालत असतात. शास्त्रानुसार प्रत्येक राशींचा एक स्वामी ग्रह असतो. या ग्रहांचा प्रभाव राशींवर पडतो. त्यामुळेच प्रत्येक राशीचे गुणधर्म त्या-त्या स्वामी ग्रहानुसार बदलत असतात. ज्योतिषीय अभ्यासात काही राशींना अतिशय नशीबवान समजण्यात आले आहे. १२ पैकी ३ राशी अशा आहेत ज्या अत्यंत खास आहेत. या राशींना नेहमीच नशिबाची साथ मिळते. त्यामुळे या राशीचे लोक नेहमीच सुखी आणि आनंदी असतात. वास्तविक या राशींवर त्यांच्या स्वामी ग्रहाचा प्रभाव असल्याने त्या राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येतात. पाहूया या राशी नेमक्या कोणत्या आहेत? आणि त्यांचे स्वामी ग्रह कोणते आहेत?
राशीचक्रातील दुसऱ्या क्रमांकाची राशी म्हणून वृषभ राशीला ओळखले जाते. राशीचक्रातील ३ नशीबवान राशींपैकी एक राशी वृषभ आहे. वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असतो. शुक्राला सुखसमृद्धी, प्रेम, विलासिनता, धनसंपत्ती आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. या राशीवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळेच या राशीचे लोक धनवान आणि आकर्षक असतात. दृढ निश्चयाच्या जोरावर कोणतेही कार्य हे लोक पूर्णत्वास नेतात. मेहनतीच्या जोरावर या लोकांना धनसंपत्ती अफाट मिळते. त्यामुळे वृषभ राशीचे लोक बऱ्यापैकी चैनीचे आयुष्य जगत असतात. जिद्दी आणि चिकाटी वृत्तीने हे लोक आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होतात.
तीन नशीबवान राशींच्या यादीत सिंह राशीचासुद्धा आवर्जून समावेश होतो. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असतो. सूर्य हा नेतृत्व, तेज, बुद्धी, शक्ती यांचा प्रतीक आहे. सूर्याचा प्रभाव सिंह राशीवर असतो. त्यामुळे सूर्याचे गुणसुद्धा या राशींमध्ये पाहायला मिळतात. या राशीचे लोक प्रचंड उत्साही आणि आत्मविश्वासपूर्ण असतात. या लोकांमध्ये मूळातच नेतृत्व गुणधर्म असतो. त्यामुळे लोकांचे नेतृत्व करण्यात आणि त्यांना प्रभावित करण्यात हे लोक सक्षम असतात. सिंह राशीच्या लोकांना आयुष्यात अनेक चांगल्या संधी मिळतात. त्यामुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात अतिशय यशस्वी असतात. शिवाय हे लोक निडर असतात. कोणत्याही परिस्थितीत मागे न सरकता धैर्याने त्याचा सामना करतात. समाजात त्यांना प्रचंड मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभते. कार्यक्षेत्रात यांच्या कामाचे नेहमीच कौतुक होते.
धनु राशीसुद्धा अतिशय खास असते. धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु असतो. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला सर्वात शुभ ग्रह समजले जाते. शिवाय गुरु ग्रह ज्ञान, शिक्षण, प्रगती यांचे प्रतीक असतो. त्यामुळे धनु राशीच्या लोकांवरसुद्धा या गुणधर्मांचा मोठा प्रभाव पडतो. या राशीचे लोक नेहमीच सकारात्मक आणि आशावादी असतात. त्यामुळेच त्यांना प्रत्येक गोष्टीत मनासारखे यश प्राप्त होते. शिवाय या लोकांना समाजात मानसन्मानसुद्धा मिळतो. कमी कालावधीत जास्त प्रगती या लोकांना मिळते. तसेच हे लोक स्वतः काम करण्याऐवजी इतरांकडून काम करुन घेण्यात हुशार असतात. विशेष म्हणजे या लोकांना भाग्याची साथ मिळते.
संबंधित बातम्या