जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. विविध ग्रह राशी परिवर्तन करत गोचर करत आहेत. त्यामुळे या महिन्यात विविध योग जुळून येत आहेत. आज मंगळवार ९ जुलै २०२४ रोजी चंद्र सिंह राशीत भ्रमण करत आहे. या भ्रमणातून चंद्र आणि गुरु एका केंद्रस्थानी येऊन गजकेसरी योगाची निर्मिती करत आहेत. गजकेसरी योगाचा प्रभाव राशीचक्रातील राशींवरसुद्धा पडत आहे. या योगात काही राशींना प्रत्यक्ष तर काहींना अप्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. गजकेसरी योगात आज लाभ मिळणाऱ्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत याबाबत जाणून घेऊया.
आज गजकेसरी योगाचा दिवस वृषभ राशीसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आज अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य लाभेल. त्यामुळे कामात गती येईल. तुम्हाला आज अनपेक्षितपणे धनलाभ होण्याचा योग आहे. गजकेसरी योगात तुमची आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे. उद्योग-व्यवसायात चांगला नफा होईल. शिवाय तुम्हाला लोखंड किंवा धातूच्या कामातून आर्थिक लाभ होईल. अचानक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील.
सिंह राशीसाठी आज गजकेसरी योग लाभदायक ठरणार आहे. आज गजकेसरी योगात तुमची आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे. याकाळात तुमची जुनी येणी वसूल होतील. अनपेक्षितपणे पैसा मिळाल्याने मनात उत्साह निर्माण होईल. महत्वाची कामे विनाअडथळा पार पडतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायानिमित्त प्रवास घडून येईल. त्यातूनसुद्धा लाभच होणार आहे. व्यवसायात एखादी मोठी डील आज पदरी पडेल. भविष्यात त्यातून प्रचंड फायदा मिळणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहील.
तूळ राशीच्या लोकांना आज गजकेसरी योगाचा विशेष लाभ मिळणार आहे. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मनात आखलेल्या योजना आज प्रत्यक्षात येतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होईल. शिवाय कामधंदा विस्तारण्यास मदत होईल. आज एखादी गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. विविध मार्गाने धनलाभ होईल. मिळकतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. आपल्या वाणी आणि कल्पना शक्तीच्या जोरावर कार्यक्षेत्रात नावलौकिक मिळवाल. एकंदरीत आजचा दिवस उत्तम असणार आहे.
गजकेसरी योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. कार्यक्षेत्रात विविध कल्पना डोक्यात येतील. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. कामाच्या ठिकाणी शत्रूंवर मात करण्यात यशस्वी व्हाल. राजकीय क्षेत्रात असणाऱ्यांना या योगात निश्चित लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. स्थावर संपत्तीत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. पुरुषांना आज या योगात सासुरवाडीकडून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.