मराठी बातम्या  /  Astrology  /  Horoscope Marathi Today 28 May 2023 See Details

Horoscope Marathi 28 may 2023 : दुर्गाष्टमी कोणत्या राशिवाल्यांसाठी लाभदायक?, वाचा आजचे राशीभविष्य

Todays Horoscope 27 May 2023
Todays Horoscope 27 May 2023 (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
May 28, 2023 06:13 AM IST

Todays Horoscope 27 May 2023 : आजच्या दिवशी अनेक लोकांना आरोग्य आणि कुटुंबाची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच काहींना लांब प्रवासाचे योग आहेत.

मेष: आज विद्याभ्यासात अत्यंत शुभ दिनमान आहे. स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल.कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. आरोग्याच्या थोडयाफार समस्या उद्‌भवतील. संततीकडून शुभ संदेश मिळतील. समाधानकारक दिनमान राहील. परदेशभ्रमण घडेल. मोठे आर्थिक लाभ होतील. शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.

ट्रेंडिंग न्यूज

वृषभ: आज जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. आज मनोबल उंचावेल. व्यवहार चातुर्य आणि संयमी भुमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. नोकरीत आपल्या कामाप्रती सजग राहा. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. नातेवाईक आप्तेष्टा कडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल.मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुंटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदार नोकरीत असेल तर प्रमोशन होण्याची शक्यता आहे. शुभरंग: सफेद शुभदिशा: वायव्य.

मिथुन: आज आपणास मानसिक दृष्टीकोनातून ताणतणाव जाणवेल. अडचणीत आणणारा दिवस आहे. नोकरीत अतिउत्साही आणि अतिरक पणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्ज प्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. मोठे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.

कर्कः आज मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मनावर नियंत्रण ठेवून संयम राखावा. आपल्या स्वभावात चिडचिडपणा निर्माण होईल. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे. आजार उद्भभवतील. शस्त्रक्रियासारखी घटना संभवते. मानसिक उत्तेजना व विद्रोह वाढेल. नोकरीत अत्यंत सावधानीपूर्वक वाटचाल ठेवावी. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगारात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. शुभरंग: तांबडा शुभदिशा: वायव्य.

सिंह: आज शुभ दिनमान फलदायी आहे. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आपल्या कार्यक्षेत्रात यश संपादन कराल. नोकरीतील बदल मोठे फायदेशीर ठरतील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. पत्नीसोबत गोडी व दुरावा असे दोही फळे अनुभवास येतील. परदेशगमन व दुरचे प्रवास घडणार आहे. सुखदायी दिवस व्यतीत कराल. शुभरंग: केसरी शुभदिशा: पूर्व.

कन्या: आज आपण स्वतःला सिद्ध कराल. आपला दिवस सफलतापूर्वक व्यतीत होईल. कार्यक्षेत्रात योग्यवेळी घेतलेला निर्णय फायदेशीर राहिल. नोकरीत नवीन योजनेवर केलेले प्रयत्न सफल होतील. नोकरीत वरिष्ठांकडून केलेल्या कामासाठी दाद मिळेल. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. राजकीय सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. मित्रमंडळींचे व कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. मनोबल उंचावेल. शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर.

तुला: आजचे दिनमान समिश्र मध्यम स्वरूपाचे फलदायी आहे. व्यवहार काळजीपूर्वक करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना अनुकुल दिवस आहे.विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचनमनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.व्यापारानिमित्त प्रवास होईल. हानी होण्याची शक्यताआहे. कुटुंबात मतभेद संभवतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा. वारसा हक्काच्या संपत्ती बद्दल कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागेल. शुभरंग: गुलाबी शुभदिशा: पश्चिम.

वृश्चिक: आज व्यक्तिमत्वात वाढ होईल. मनाजोग्या घटना घडतील. मनोधैर्य कमालीचे उचांवलेले असेल. अनुकुल स्थिती राहणार आहे. नोकरी रोजगारात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांकडुन समाधान मिळेल. आत्मविश्वास द्विगुणित करणारे दिनमान आहे. प्रवास हितकर होतील. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. शुभरंग: लाल शुभदिशा: दक्षिण.

धनुः आज आपणास दिनमान काहीस त्रासदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहिल. भांडण वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील. आशावादी दृष्टीकोनातून सतत विचार करावा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक हानीची शक्यता आहे. गुंतवणुक टाळा. शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.

मकर: आज आपण केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. नावलौकिकतेला यशाचाही जोड आज मिळणार आहे.आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. आजचे प्रयत्न सफलदायक ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. शत्रुवर मात कराल. कोर्टकचेरीच्या कामास गती मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल. व्यापार रोजगारात अनुकूल अशी सफलता मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य लाभेल. शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.

कुंभ: आज मनाला समाधान लाभेल अश्या अनेक घटना घडतील. आपली इच्छापूर्ती व प्रलंबित कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल. मान-सम्मान वाढेल.नोकरीत अचानक बदल घडतील. संशोधन क्षेत्रातील मंडळीना मान सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठया प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. वाढविवाद मात्र टाळावे. लाभाच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील. शुभरंग: निळा शुभदिशा: नैऋत्य.

मीन: आज आपणास भौतिक आणि आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. गुरूस्वराशीत असल्याने देव आणि धर्माविषयी विशेष आस्था निर्माण होईल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. लेखन प्रकाशित होईल. स्पर्धापरिक्षेत यश संपादन होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. बँकेत व्यवहार करताना जपून करावा. मुलांकडून समाधान लाभेल. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. दुरवरचे प्रवास लाभदायक होतील. परदेश भ्रमणाचे योग आहेत. शुभरंग: नारंगी शुभदिशा: ईशान्य.

WhatsApp channel