Mangal Gochar 2025: मंगळ सध्या वक्री आहे. मंगळ मिथुन राशीत वक्री होणार आहे. या नव्या वर्षातील मंगळाचा हा पहिलाच बदल असणार आहे. मंगळ अजूनही वक्री आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. वक्री अवस्थेत मंगळ फारसा शुभ परिणाम देत नाही, परंतु काही राशींना हा मंगळ मात्र शुभ परिणाम देणार आहे. मंगळ ७ डिसेंबर २०२४ रोजी वक्री झाला होता आणि आता पुढील महिन्याच्या २४ फेब्रुवारी २०२५ रोजी तो मार्गी होणार आहे. यापूर्वी २१ जानेवारी २०२५ रोजी मगळ हा बुधाची राशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. मंगळाच्या या बदलामुळे कोणत्या राशींना आधार मिळेल, जाणून घ्या कोणत्या राशींसाठी हा बदल चांगला असणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांना मंगळ वक्री होऊन मिथुन राशीत जाण्याने नशीबाची साथ मिळणार आहे. याचे कारण म्हणजे मंगळ तुमच्या धनस्थानी भ्रमण करणार आहे. यामुळे तुमची नोकरीची परिस्थिती सुधारणार आहे. या बरोबरच नोकरीमुळे तुमच्याकडे पैसा येईलच, पण घर आणि इतर अनेक ठिकाणांहून तुमच्याकडे पैसा येणार आहे.
मंगळाचे हे संक्रमण आपल्या राशीच्या नवव्या भावात होणार आहे. म्हणून तूळ या राशीचे लोक भाग्यवान ठरणार आहेत. या ग्रह स्थितीच्या बदलामुळे सर्व काही तूळ राशीचेच असेल. नशिबाच्या जोरावर प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी तूळ राशीच्या जातकांनी ठेवायला हवी.
कुंभ राशीच्या जातकांच्या प्रेमजीवनातील सर्व अडचणी संपवणार आहेत आणि त्यांना सकारात्मकता मिळेल. तुमचे नाते चांगले राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ मिळेल, सौभाग्यामुळे आरोग्यही चांगले राहील. तुमची ऊर्जेची पातळी जास्त राहील. मंगळ तुम्हाला चांगले फळ देत नसेल तर मंगळ उपाय करावा. असे केल्याने तुम्हालाही फायदा होईल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या