Horoscope September 2024 : गपणती बाप्पाच्या कृपेनं सप्टेंबर महिना कसा जाईल? वाचा मासिक राशीभविष्य-horoscope for the month september 2024 see astrology predictions for all zodiac signs ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope September 2024 : गपणती बाप्पाच्या कृपेनं सप्टेंबर महिना कसा जाईल? वाचा मासिक राशीभविष्य

Horoscope September 2024 : गपणती बाप्पाच्या कृपेनं सप्टेंबर महिना कसा जाईल? वाचा मासिक राशीभविष्य

Sep 01, 2024 05:41 PM IST

Monthly Rashi Bhavishya September 2024 : सप्टेंबर महिना हा तुमच्यासाठी कसा जाईल. गणेशोत्सव आणि पितृपक्ष पंधरावडासह इतर व्रत-वैकल्य आणि शुभ योग-संयोगात हा महिना कोणत्या राशीच्या लोकांसाठी लाभाचा राहील आणि कोणाला आव्हानांना सामोरे जावे लागेल, वाचा सप्टेंबर महिन्याचे सविस्तर राशीभविष्य.

सप्टेंबर २०२४ मासिक राशीभविष्य
सप्टेंबर २०२४ मासिक राशीभविष्य

सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव आणि पितृपक्ष पंधरावाडा असून, बुध सिंह राशीत आणि रवि, शुक्र अनुक्रमे कन्या व तुला राशीत प्रवेश करत आहे. महिन्याच्या शेवटी बुध पुन्हा कन्या राशीत प्रवेश करतोय. सप्टेंबर महिन्यात शनि, हर्षल, नेपच्युन, प्लूटो हे ग्रह वक्री राहणार आहेत. ग्रह राशीबदल आपल्या जन्मराशीवर कसा प्रभाव टाकतील पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार ! वाचा मासिक राशीभविष्य!

सप्टेंबर मधील शुभ-अशुभ दिवस.

उत्तम दिवसः ०४, १०, ११, १३, १९, २६, २८.

चांगला दिवसः ०५, ०६, १०, १२, १५, २१, २५, २९.

अनिष्ट दिवसः ०१, ०२, ०९, २२, २४, ३०.

मेषः 

महिन्यात सुरुवातीच्या चंद्रभ्रमणात आपल्या कार्यक्षेत्रात परिस्थिती संयम ठेवून हाताळा. अन्यथा प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. नोकरीत स्थान बदल घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गास प्रतिकुल काळ असणार आहे. काळजीपूर्वक व्यवहार करावेत. गुप्तशत्रु विरोधकांचा त्रास जाणवेल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास अस्वस्थता जोडीदाराशी वादविवाद असे प्रसंग घडतील. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नविन समस्या उद्‌भवतील. मध्यान्न काळा नंतर ठरवलेल्या योजनांना गती मिळणार आहे. कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. आखलेल्या योजना काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पर्धकांवर मात कराल. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मेहनत वाढवावी लागेल. आहारावर आणि व्यसनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अति उत्साही आणि अतिरेक पणा टाळा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी.

चंद्रबलः ०९,१२,१५,१८,२७,२९,३०.

वृषभः 

महिन्यात व्यवसायात आर्थिक फसवणुकीची दाट शक्यता आहे. कायदेशीर प्रक्रिया कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार लांबणीवर टाका. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका विचारअंतीच निर्णय घ्यावेत. आपण बोलण्यावर संयम ठेवावा अन्यथा समस्या निर्माण होतील. लांबचे प्रवास जपुन करावेत. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. संततीच्या आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीवर लक्ष द्यावे लागेल. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल काळ नाही. मित्रमैत्रिणी व इतर प्रलोभने यांच्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. प्रतिकूल परिस्थिती सावधानतेने हाताळावी लागते. त्रासदायक काळात वादविवाद टाळा. नोकरीत अचानक बदल घडतील. वातावरण बदलणार आहे. पण बदल नजीकच्या पुढच्या काळासाठी फायदेशीर ठरणार आहेत. मेहनत वाढवावी लागणार आहे. नातेवाईक यांच्याबरोबर तुमच्या वागण्या बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.

चंद्रबलः ०१,०३,०५,०६,११,१३,१५,१७,१९.

मिथुनः 

महिन्याच्या प्रारंभीच बुध राशीबदल करत असल्याने आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. कुटुंबात कटकटी होतील. सुखाच्या अपेक्षेने विनाकारण श्रम करीत राहाल. आरोग्य नरम गरम राहील. स्वत:च्या नातेवाईकांकडुन अपमान होण्याची शक्यता आहे. तरूण तरूणीचे विवाहाचे योग आहेत. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल . पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. तिच्या आजारपणामुळे दगदग वाढेल. आपला स्वभाव त्यागी चंचल असा राहील. संतती विषयी चिंता निर्माण होतील. डोळ्याचे विकार होण्याची शक्यता आहे. नातेवाईकाकडुन फसवणुक होईल. भागीदारा सोबत वादविवाद टाळा. प्रवासात काळजी घ्या. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर नाराज होतील. भागिदार चांगले मिळतील. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे शत्रु निर्माण होतील. मध्यान्न काळानंतर अनुकूलता लाभेल. परिस्थितीत काहीसी सुधारणा होईल. व्यवसायात बेताचीच गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यास उत्तम जमेल. भागिदारी व्यवसाय जपून करणे आवश्यक आहे.

चंद्रबलः ०७,०८,१२,१५,१६,१८,२६,२७.

कर्कः 

महिन्यात रवि बदलात अचानक धनलाभाची संधी मिळेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळलेले योग्य राहील. जोडीदाराशी आपले विचार कमी जुळतील. प्रकृती कडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अध्यात्मिक भावना वाढीस लागेल. नोकरदारांनी वरिष्ठांचे म्हणणे ऐकणे जरुरीचे आहे. अन्यथा नोकरीतील बदलास आपणास सामोरे जावे वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे. आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा. अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे. कायदेशीर व्यवहार करा. मध्यान्न काळानंतर वडिलार्जित इस्टेट आपणास मिळण्याचा योग आहे. आर्थिक प्रगति करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्य जपणे ही नितांत गरजेचे आहे. आरोग्याबाबतीत त्रासाकडे दुर्लक्ष करु नये. आपणाला अपेक्षीत आणि फायद्याच्या असणाऱ्या घटना घडतील. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल.

चंद्रबलः ०३,०६,०९,१०,१२,१५,२१.

सिंहः 

महिन्याच्या सुरुवातीस उत्तम चंद्रबल लाभल्याने आपल्या मनोकामना पूर्ण करणारे योग आहेत. आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारांकडून आपणास आर्थिक आवक चांगली होईल. आरोग्याच्या तक्रारी किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष नको. महिला वर्गास शासनाकडून सन्मान मिळेल. त्याचबरोबर आर्थिक लाभही उत्तम होईल. पैशाची आवक आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल. आपण आपल्या बोलण्यावर संयम ठेवाल तर बऱ्याच समस्या कमी होतील. विद्यार्थ्यांनी चिडखोरपणा वाढू देवू नये. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. संतती प्राप्तीचे योग उत्तम आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या वर मर्जी ठेवणार आहे. इच्छीत नोकरी आपणास मिळण्यास काहीच शंका नाही. महिलांना काळ अनुकूल आहे. जोडीदाराशी मतभेद टाळावे. वाहन घर खरेदीचा योग आहे. परदेश भ्रमणात फायदा होईल. मित्र मैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

चंद्रबलः ०८,०९,१०,१३,१५,२१,२३,२५.

कन्याः 

महिन्यात बुध राशीपरिवर्तनात व्यापारात भागिदारीमुळे आपल्या व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. आपण सतत कामात तर असताच व कोणतेही काम चिकाटीने पूर्णत्वास करण्याचा आपला स्वभाव आपल्याला या वेळी साथ देणार आहे. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. व्यापार वर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहमान आहे. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन. त्यामुळे आपण खुष असाल. एकंदरीत ग्रहस्थिती मानसिक स्वस्थ्य उत्तम देणारी आहे. आपल्या समोर नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. संतती योग उत्तम आहे. आपल्या आयुष्यातील अनपेक्षीत शुभप्रद घटना घडतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश संपादन होईल. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. कोर्टकचेरीची कामे सुरळीत पार पाडणारा योग आहे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक काळ आहे.

चंद्रबलः ०२,०३,०८,१२,१४,१७,२१,२३,२७.

तूळ: 

महिन्यात शुक आपल्या राशीत प्रवेश करीत आहे. अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अशा स्थितीत आपण स्वतःवर नियंत्रण ठेवा. कामात सातत्य ठेवा. सदैव कार्यरत राहणे गरजेचे आहे. पैसे गुंतवताना संयम बाळगा. संताप आणि चिडचिड निर्माण करेल. तसेच या महिन्यात खर्चावर नियंत्रण करावे लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. मात्र स्वतंत्र व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. मीडिया कला क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची प्रतिकुलता आहे. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढेल. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. महिन्याच्या मध्यान्न काळानंतर शुक्र-बुध या ग्रहांची अनुकूलता लाभणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. शत्रुवर विजय मिळवाल. चागंले मित्र मिळतील. अनेक इच्छा पुर्ण होतील. आपण धन संचय कराल. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. कर्मचाऱ्यांकडून कसुन काम करून घ्याल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. तरूण तरूणीचे विवाहाचे योग आहेत. नवीन घर खरेदीचे योग पण आहेत. कलाकारांना हा सप्ताह चांगला जाईल.

चंद्रबलः ०९,१०,१३,१५,१६,२२,२४,२६,२७.

वृश्चिकः 

महिन्यात बुध राशीबदलात विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीदायक यश मिळणार आहे. आपण केलेले नियोजन सुरळीत पार पडेल. कोर्टकचेरीच्या कामांसाठी काळ अनुकूल आहे. आपण विवाहाच्या विचारात असाल तर तुलसी विवाहानंतर विवाहयोग आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांमध्ये सहभाग घेतला तर यश मिळेल. नोकर वर्गाने वरिष्ठांशी संयमाने वागावे लागणार आहे. आपली बदली मनाविरुद्ध होण्याची संभावना आहे. सुशिक्षीत तरूण बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. व्यवसायिकांनी भागीदारी न करणे योग्य आहे. व्यवसायात आपणाला अपेक्षित फायदा न झाल्याने आपण चिंतीत असाल. भागिदारी व व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कर्जामुळे आपणास त्रास जाणवेल. महिन्याच्या मध्यान्न काळानंतर अनुकूल ग्रहमान लाभणार आहे. त्यामुळे व्यवसायिक समाधानी असतील नातेवाईक मित्रमंडळी यांची साथ उत्तम मिळेल. व्यवसायिकांनी व्यवसायात गुंतवलेले भांडवल फायदेशीर ठरेल. नवीन घराची खरेदी करण्यास काळ अनुकूल आहे. प्रेमी युगुलांसाठी काळ अनुकूल आहे. सामाजिक कार्यात ज्यांचा सहभाग आहे. व्यापारी वर्गाने आर्थिक गुंतवणूक केली तर त्यामध्ये फायदा निश्चित होईल.

चंद्रबलः ०२,०४,०७,११,२५,२६,२८.

धनुः 

महिन्यात बुध शुक्र राशीबदल आणि इतर ग्रहयोग अनुकूल राहतील. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तींसाठी काळ यशदायक आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यवसायामध्ये आर्थिक आवक उत्तम प्रकारे आलेली अनुभवास येईल. प्रगतीचा आलेख उंचावलेला असेल. नोकरदारांसाठी ग्रहमान साथ देणार आहे. आपणास प्रिय असणारी नोकरीमध्ये बढतीची बातमी वरिष्ठ आपल्याला देणार आहे. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. स्वत:च्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल. वास्तू खरेदी करुन घेतच आहात त्याच बरोबर वाहन खरेदी केल्यामुळे आपले घरातील व्यक्ती आपणावर प्रेमाचा वर्षाव तर नक्कीच करणार आहे. कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे. त्याच बरोबर कामामध्ये विलंब लागण्याची संभावना आहे. प्रवासातून आपणास योग्य दिशा मिळेल. आर्थिक बचत आपण उत्तम प्रकारे करु शकाल. आपल्या समस्येपेक्षा दुसऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी आपण नेहमी तत्पर रहाल. आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल.

चंद्रबलः ०३,०५,०८,२१,२३,२८,३०.

मकरः 

महिन्यात शनि अनुकूल असल्याने व्यापारात आर्थिक तेजी राहिल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. आपण सतत कामात तर असताच व कोणतेही काम चिकाटीने पूर्णत्वास करण्याचा आपला स्वभाव आपल्याला या वेळी साथ देणार आहे. जुन्या मित्रमैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. लेखक वर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहयोग आहेत. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन त्यामुळे आपण खुष असाल. एकंदरीत ग्रहस्थिती मानसिक स्वस्थ्य उत्तम देणारी आहे. आपल्या समोर नवीन व्यवसायाचे प्रस्ताव इतर व्यावसायिक मांडतील. संतती योग उत्तम आहे. आपल्या आयुष्यातील अनपेक्षीत शुभप्रद घटना घडतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक काळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. सरकारी कामाच्या दृष्टीने अनुकुलता लाभेल.

चंद्रबलः ०५,०७,११,१३,२०,२४,२५,२९.

कुंभः 

महिन्यात बुध शुक्र युतीयोगात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम कालावधी आहे. नोकरी व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील. त्यातून निश्चित लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मात्र आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राजकीय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. गतकालीन केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. वाहन घर खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहिल. मानसिक स्वास्थ लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदारा बद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम कालखंड आहे. विरोधकावर मात कराल.

चंद्रबलः ०७,१२,१४,१८,२०,२३,२४,२६.

मीनः 

महिन्यात रविच्या राशी परिवर्तनात नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ लाभेल. वाहन सौख्य मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. व्यापारात व्यवसियाकांनी केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. स्पर्धापरिक्षेत आपण यशस्वी व्हाल. कला लेखकवर्गास लिखाणाच्या माध्यमा तून उत्तम प्रसिद्धि योग आहेत. विरोधकावर मात करण्यास काळ उत्तम आहे. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात आनंदी वार्ता मिळेल. मानसिक अवस्था उत्तम राहील. आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल. कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका. अन्यथा स्वताःचे नुकसान करून घ्याल. अतिउत्साही व अविचारी घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. आर्थिक आघाडीवर महिना उत्तम राहणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईका कडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संतती सौख्यही उत्तम असेल. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.

चंद्रबलः ०४,०९,११,१३,१६,१५,२५,२७.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)