मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope March 2024 : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना कसा होईल? वाचा, मार्च महिन्याचं सविस्तर राशीभविष्य

Horoscope March 2024 : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना कसा होईल? वाचा, मार्च महिन्याचं सविस्तर राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 01, 2024 10:20 AM IST

Monthly Rashi Bhavishya March 2024 : बारा महिन्यातील तीसरा महिना म्हणजे मार्च हा तुमच्या जीवनात कसे बदल घडवून आणेल व किती रंग भरेल. यंदा वर्ष २०२४ मध्ये मार्च महिना तुम्हाला किती महत्वाचा व आनंदाचा ठरेल जाणून घ्या.

Horoscope March 2024
Horoscope March 2024

मार्च महिन्यात मंगळ आणि शुक्र कुंभ राशीत तर रवि आणि बुध मीन राशीत प्रवेश करणार आहेत. महिन्याच्या मध्यान्न काळानंतर बुध मार्गक्रमण करीत मेष राशीत प्रवेश करेल. अर्थात बौद्धीक वादी बुध मीन आणि मेष राशीत राहणार आहे. अस्त बुध आणि न्यायदेवता शनि याचा उदय होणार आहे. बुध,शुक्र या शुभ फलदायक सौम्य ग्रहांचा तर मंगळ,रवि या तणोगुणी ग्रहांच्या राशी संक्रमणाचा कसा प्रभाव राहील! जाणुन घेऊयात आपल्या राशीनुसार! वाचा मासिक राशीभविष्य!

मार्च मधील शुभ-अशुभ दिवस.

उत्तम दिवसः ०१,११,१६,१९,२१,२८,३०.

चांगला दिवसः ०३,०४,१३,१५,१८,२३,२६.

अनिष्ट दिवसः ०२,०५,०८,०९,१०,१२,२४,२५,२८.

मेषः 

महिन्यात ग्रहयोग पाहता व्यापारात भागिदारीमुळे आपल्या व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. आपण सतत कामात तर असताच व कोणतेही काम चिकाटीने पूर्णत्वास करण्याचा आपला स्वभाव आपल्याला या वेळी साथ देणार आहे. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. लेखक वर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग दुग्धशर्करा आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहयोग आहेत. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन त्यामुळे आपण खुष असाल. एकंदरीत ग्रहस्थिती मानसिक स्वस्थ्य उत्तम देणारी आहे. आपल्या समोर नवीन व्यवसायाचे प्रस्ताव इतर व्यावसायिक मांडतील. संतती योग उत्तम आहे. आपल्या आयुष्यातील अनपेक्षीत शुभप्रद घटना घडतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून बक्षीस मिळेल. तुमच्या कामाचे गोडकौतुक केले जाईल. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. कोर्टकचेरीची कामे सुरळीत पार पाडणारा योग आहे. शेअर्स खरेदी तूर्तास लांबणीवर ठेवलेली योग्य राहील. मनासारख्या घटना घडण्यास पूरक काळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील.

चंद्रबलः २,४,५,७,१०,११,१४,१९,२६,२८.

वृषभः 

महिन्यात सुरुवातीचे चंद्रभ्रमण आणि ग्रहयोग पाहता पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदारांशी सौजन्याने वागावे. कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांसाठी काळ अनुकूल आहे. व्यापारात व्यापारीवर्गाना अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. कलाकारांना मान आणि प्रसिद्धीचे योग आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. जमिनीच्या व्यवहारात लाभ होतील. महिन्यातील मध्यान्न काळानंतर तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र नोकरीत बदलाच्या संधी लांबणीवर पडतील. व्यावसायिकांना प्रगतीचा काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. धाडसी निर्णय घेताना घरातील व्यक्तीला विश्वासात घ्या.

चंद्रबलः २,३,५,६,९,१०,१२,१५,२१,२४,२८.

मिथुनः 

महिन्यात प्रारंभी चंद्रभ्रमण आणि पाहता त्रास दायक कालावधी आहे. वाहन प्रवास आपणास करण्यास आवडत असला तरी थोडासा आवर घालावा लागणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढते ठेवणारा आहे. तेव्हा खर्च जपूनच करावा लागणारआहे. प्रॉपर्टी विक्री पासून नुकसान होण्याची संभावना आहे. शेअर्स अधिकची गुंतवणूक सध्या फायदेशीर नाही सध्या प्रेमी युगुलांनी प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपून घेणे गरजेचे आहे. फसवणूकीची संभावना आहे. कर्ज प्रकरणामुळे त्रास होईल. महिला वर्गाने आपले आरोग्य जपणे गरजेचे आहे. शासकिय सेवेत असणाऱ्यांसाठी काळ प्रतिकुल आहे. आपणास अतिशय प्रिय असणारा प्रवास हा दूरचा होणार आहे. नोकरदार नोकरी बदलण्याच्या विचारात असतील तर तूर्तास विचार टाळावेत. सामाजिक प्रतिष्ठेस तडा जाण्याची संभावना आहे. व्यवसायिकांना भागिदारीत सामजस्यपणाची भुमिकेतुन वाटचाल करावी लागेल. आरोग्याच्या तक्रारी वाढविणारे आहे. कार्यक्रमांमध्ये वस्तूंची जपणूक करणे गरजेचे आहे.मित्र मैत्रिणीं सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. विद्यार्थ्यांनी आळस न करता उत्साहाने अभ्यास करावा लागणार आहे. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळल्या पाहिजेत. घरातील वातावरण एकंदरीत ताणतणावाचे असल्यामुळे आपली आर्थिक स्थिती चिंतादायक असेन. कर्ज काढताना निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे.

चंद्रबलः ४,५,६,७,८,२४,२५,२६ २८.

कर्कः 

महिन्याच्या सुरुवातीस शुभ फलदायी वातावरण राहणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. मनावरचा ताण बऱ्यापैकी कमी झालेला असेल. आर्थिक व सामाजिक कार्यात प्रगती कराल. नवनवीन मार्गाने धनलाभ होईल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आपले मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल. राजकीय सामाजीक क्षेत्रातील कामाचे कौतुक होईल. शासकिय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मान सन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्या मुळे लौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहिल. मानसिक स्वास्थ लाभेल. आपण केलेल्या प्रयत्नास सफलतापूर्वक यश मिळेल. मध्यान्न काळानंतर कष्टमय स्थिती वातावरण राहण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांनी भागीदारी न करणे योग्य आहे. व्यवसायात आपणाला अपेक्षित फायदा न झाल्यामुळे आपण चिंतीत असात. भागिदारी व व्यवसायातले व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कर्जामुळे आपणास त्रास जाणवेल.

चंद्रबलः ५,७,८,११,१३,१५,१७,२४,२५,२६ .

सिंहः 

महिन्यात चंद्रभ्रमण आणि ग्रहयोग प्रगतिशील राहतील. खेळाडूंसाठी काळ यशदायक आहे. शेअर्स मध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यवसायामध्ये आर्थिक आवक उत्तम प्रकारे आलेली अनुभवास येईल. प्रगतीचा आलेख उंचावलेला असेल. नोकरदारांसाठी ग्रहमान साथ देणार आहे. आपणास प्रिय असणारी नोकरीमध्ये बढतीची बातमी वरिष्ठ आपल्याला देणार आहे. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. स्वत:च्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल. वास्तू खरेदी करुन घेतच आहात त्याच बरोबर वाहन खरेदी केल्यामुळे आपले घरातील व्यक्ती आपणावर प्रेमाचा वर्षाव तर नक्कीच करणार आहे. कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे. त्याच बरोबर कामामध्ये विलंब लागण्याची संभावना आहे. प्रवासातून आपणास योग्य दिशा मिळेल. आर्थिक बचत आपण उत्तम प्रकारे करु शकाल. आपल्या समस्येपेक्षा दुसऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी आपण नेहमी तत्पर रहाल. विवाह इच्छुकांचे विवाहयोग उत्तम आहे. आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे.

चंद्रबलः १,३,५,७,९,१०,१६,२२,२६,२८.

कन्याः 

महिन्यात ग्रहयोग पाहता सुरुवातीस अचानक धनलाभाची संधी मिळेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळलेले बरे. जोडीदाराशी आपले विचार कमी जुळतील. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उपासने मध्ये खंड पाडेल. नोकरदारांनी वरिष्ठांचे म्हणणे ऐकणे जरुरीचे आहे. अन्यथा नोकरीतील बदलास आपणास सामोरे जावे वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे. आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील. प्रयत्नांदी परमेश्वर याचा काहीसा अनुभव आपणास येईल. महत्वाच्या कामासाठी भाग्य आपणा बरोबर असावे लागते याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेणार आहात. मध्यान्न काळानंतर वडिलार्जित इस्टेट आपणास मिळण्याचा योग आहे.आर्थिक प्रगति करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्य जपणे ही नितांत गरजेचे आहे. आपणाला अपेक्षीत असणाऱ्या घटना घडतील.व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. मानसिक भिती आपणास वाटेल.

चंद्रबलः २,३,५,६,९,१०,१२,१५,२१,२४,२८.

तूळ: 

महिन्याच्या सुरुवातीस आपल्या मनोकामना पूर्ण करणारे योग आहेत. आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारांकडून आपणास आर्थिक आवक मिळेल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. त्याचबरोबर प्रसिद्धीपण मिळेल. आरोग्याच्या तक्रारी किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष नको. महिला वर्गास शासनाकडून सन्मान मिळेल त्याचबरोबर पैशाची आवक आपल्या अपेक्षे प्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल. आपण आपल्या बोलण्यावर संयम ठेवाल तर बऱ्याच समस्या कमी होतील. विद्यार्थ्यांनी चिडखोर पणा वाढू देवू नये. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. संतती प्राप्तीचे योग उत्तम आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या वर मर्जी ठेवणार आहे. इच्छीत नोकरी आपणास मिळण्यास काहीच शंका नाही. महिलांना काळ अनुकूल आहे. जोडीदाराशी मतभेद टाळावे. वाहन घर खरेदीचा योग आहे. परदेश भ्रमणात फायदा होईल. प्रेमी युगुलांनी टोकाची भूमिका घेण्या पर्यंत वादविवाद टाळावे.

चंद्रबलः१,८,९,१०,१४,१५,२२,२४,२८.

वृश्चिकः 

महिन्यात आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करण्यासा ठी ग्रहांची अनुकूलता आहे. सफलतेचा आनंद मिळणार आहे. हितशत्रू अर्थात गुप्तशत्रू पासुन सावध राहावे. घरातील वातावरण बिघडणार नाही. नात्यांमध्ये गैरसमज होणार नाही याची खबरदारी घ्यावी. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरी तील वातावरण चांगले राहील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. बरोबरचे सहकारी कामात उत्तम साथ देतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. भागीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. अचानक खर्च वाढतील. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. घर वाहन खरेदीचे योग येतील. मन प्रसन्न आणि आनंदी असेल. व्यवसायिकांना आर्थिक लाभ होईल. जास्त फायदा मिळण्याच्या टृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील. कलाकारांसाठी प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. घरातील वातावरण मनाजोगे राहील. मध्यान्न काळानंतर परिस्थितीला सामोरे जाताना काही मर्यादा आखून घेणे गरजेचे आहे. तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल.

चंद्रबलः २,३,६,८,१०,२२,२४,२८.

धनुः 

महिन्यात ग्रहयुती पाहता विद्वत्तेत वाढ होईल. देवदर्शनासाठी प्रवास होईल. नोकरीन नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. परदेशगमनाचे योग आहेत. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुंटुबावर व राहत्या घरावर फार प्रेम कराल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेलअध्यात्मिक उन्नती होईल. पितृ मातृ सुख उत्तम मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. उद्योगात लाभ होईल.मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. आपण सार्वजनिक चळवळीत आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. राजकारणी लोकांना लोकप्रियता मिळेल. मध्यान्न काळानंतर काहीसी काळजी पूर्वक वाटचाल करावी. नोकरीत वरिष्ठांशी वादविवाद टाळा. स्पष्ट बोलण्यावर नियंत्रण ठेवणे तसेच गरजेपेक्षा जास्त न बोलण उत्तम राहील. नोकरीत जबाबदाऱ्या वाढणार आहेत.

चंद्रबलः २,४,६,८,१०,१३,१५,१७,२२,२७,२९.

मकरः 

महिन्यातील चंद्रभ्रमण पाहता रोजगारात नोकरीत वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. स्वभावात रागीटपणा निर्माण होईल. कुटुंबापासुन वेगळे राहण्याचे प्रसंग येतील. व्यापारात अपयश येण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या कामात अडथळे येतील. आहारावर नियंत्रण ठेवा. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. चिडचिडेपणा वाढणार आहे. आपली मानसिकेला विचलित करणाऱ्या घटना घडतीत. कामात इतरांचे सहकार्य लाभणार नाही. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. मोठमोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील. काहीसा ताणतणाव पूर्ण स्थिती निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषत: मानसिक स्वास्थ संभाळा. प्रेमप्रकरणात वितृष्ट निर्माण होऊ शकते. उधळ्या स्वभावावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा अन्यथा कर्जबाजारी व्हाल. व्यवसाय धंद्यामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली राहील. हातात कायम पैसा खेळता राहील. कुटुंबात मान मिळेल. समाधानी वृत्तीमुळे समाजात कुठेही अडचण येणार नाही. नाभपकेबाज व डामडौलपणा टाळा. नातेवाईकांकडून काही बाबतीत त्रास जाणवेल.

चंद्रबलः १,४,६,८ १०,१४ १६,१८ १९ २२ २४,२७.

कुंभः 

महिन्यात आपल्याला मिळालेल्या संधीच सोनं करता येणं अगदी शक्य आहे. प्रयत्नांची आणि कष्टांची शर्थ करा. यश तुमचेच आहे. प्रत्येक व्यवहारात व कामात यश व पैसा निश्चितच मिळेल. ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. नफ्यात वाढ होईल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक उत्कर्षाचा साप्ताहिक कालखंड आहे. विवाहितांना जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला मार्गदर्शन व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी ठरणार आहे. संततीने घेतलेल्या मेहनतीचे चीज झालेले दिसेल. मुलांचे समाजात त्यांच्या क्षेत्रात कौतुक होईल. संततीला परदेश प्रवासाच्या संधी येतील. मनाचा निश्चय सोडू नका. नकारात्मक विचार दूर ठेवा. रिअल इस्टेट जमीन जागा खरेदी विक्री करिता फायदेशीर ठरेल. आरोग्यविषयक समाधानकारक सप्ताह राहील. व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी अनुकूल काळ आहे. आपण ज्या वास्तुच्यासाठी प्रयत्न नवीन ठिकाणांना भेट द्याल. आपल्या तल्या अंगभूत गुणांनीसर्वांची मने जिंकून घ्याल. नव्या योजना तयार कराल. त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त कराल. सरकार दरबारी किंवा सामाजिक क्षेत्रात मान सन्मान मिळेल आणि आपल्या कामाचा गौरव होईल.

चंद्रबलः १,३,५,८,२३,२४,२७,२९.

मीनः 

महिन्यात सुरुवातीचे चंद्रभ्रमण आपणास मार्केट मध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम कालावधी आहे. नोकरी व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील त्यातून निश्चित लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मात्र आपल्या बोलण्यावर आणि संशयीवृत्तीवर नियंत्रण ठेवा. राजकीय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठां कडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. घर खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. विवा हइच्छुकांचे विवाह जुळतील. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नी कडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहिल. मानसिक स्वास्थ लाभेल. प्रेमसंबंधामध्ये प्रेम भावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साह वर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम कालखंड आहे. विरोधकावर मात कराल.

चंद्रबलः १,२,४,७,८,१२,१५,१६,२७,२८

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)