मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope June 2024 : जून महिन्यात ‘या’ चार राशींचा भाग्योदय; सर्व इच्छा पूर्ण होणार, वाचा मासिक राशीभविष्य

Horoscope June 2024 : जून महिन्यात ‘या’ चार राशींचा भाग्योदय; सर्व इच्छा पूर्ण होणार, वाचा मासिक राशीभविष्य

Jun 01, 2024 11:03 AM IST

Monthly Rashi Bhavishya June 2024 : जून महिना हा तुमच्यासाठी कसा जाईल. यंदा वर्ष २०२४ मध्ये जून महिना तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरेल, भाग्याची किती साथ मिळेल जाणून घ्या.

Horoscope June  2024 : जून महिन्यात ‘या’ चार राशींचा भाग्योदय; सर्व इच्छा पूर्ण होणार, वाचा मासिक राशीभविष्य
Horoscope June 2024 : जून महिन्यात ‘या’ चार राशींचा भाग्योदय; सर्व इच्छा पूर्ण होणार, वाचा मासिक राशीभविष्य (Pixabay)

जून महिन्यात गुरू आणि शुक्राचा उदय होणार असून राशीपरिवर्तन करीत आहे. हर्शल,मंगळ,रवि,शुक्र बुध या ५ ग्रहाचं राशीपरिवर्तन 'या' राशींसाठी फायदेशीर सिद्ध होणार! पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी !

वृषभः महिन्यात ग्रहांची अनुकूलता आहे. आपला आत्मविश्र्वास द्विगुणित होईल. आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकाल. आर्थिक उत्कर्ष होईल. परंतु आपणास योग्य आर्थिक नियोजन करावे लागेल. आपणास एखादी मोठी जमीन किंवा स्थावर मिळू शकेल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात लक्षणीय यश मिळेल. कर्तृत्वाला उजाळा देणारा महिना असणार आहे. महत्त्वाकांक्षा नोकरी कामात बदलाची संधी या बदला बरोबरच सत्ता अधिकार मिळणार आहे आणि आर्थिक फायदा अंशतः वाढणार आहे. स्वतंत्र व्यवसाय ग्रहसंकेत उत्तम आहेत. नवीन करार अथवा योजना मार्गी लागतील. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत. 

आर्थिक आवक वाढणार आहे. स्थावर यात गुंतवणूक करताना सल्ला घ्यावा. उच्चशिक्षण घेणाऱ्या अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. लेखकवर्ग संपादन कलाकार यांच्याकडून उत्तम कलेची निर्मिती होईल. आपणास नशिबाची साथ मिळेल. आपली कामे सुरळीतपणे पार पाडू शकाल. आपण दूरवरचे प्रवास सुद्धा कराल व त्यामुळे आपला उत्साह वाढून आपल्या जीवनात नावीन्य निर्माण होईल.

विशेष शुभ तारिखः ०३,०४,२१,२२,२६.

कन्याः महिन्यात रोजगारात नवीन पद्धतींचा वापर केल्यास उत्तम यश संपादन करा. नोकरीत आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रगती साधाल. नियोजनबद्ध पद्धतीने केलेली आर्थिक गुंतवणूक लाभ देईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल आणि घरात काही शुभ घटना घडू शकतात. 

नवीन ठिकाणी कामाची संधी प्राप्त होईल. मनोवृत्ती आनंदी राहिल. व्यापारात उत्कृष्ठ प्रगती कराल. राजकीय सामाजिक व्यक्तींना मोठी जबाबदारी पदप्रप्ती व मानसन्मान मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्साही आणी ऊर्जादायक राहणारआहे. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. वाहन खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. 

शेअर मार्केट मध्ये अल्पकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. पूर्ण तत्परतेने प्रयत्नशील राहा. यश निश्चित लाभेल. मन आनंदी राहिल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक व सामाजिक कार्यात प्रगती कराल. उत्कर्षकारक कालावधी राहील. परदेशातील प्रवासातुन लाभ होईल. गतकाळातील कार्यातून तुम्हाला लाभ मिळू शकतो. आपणास शासनाकडून सुद्धा काही लाभ मिळण्याची संभावना आहे.

विशेष शुभ तारिखः ०४,०५,११,१६,२१,२२.

मकरः महिन्यात आपणास अनुकूल ग्रहस्थिती आहे. शुभ फलदायी घटना घडणार आहेत. आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. अनेक दिवसांपासून प्रतिक्षीत असलेल्या एखाद्या प्रवासाला जावू शकता. घरात आनंदाचे वातावरण असेल. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून पूर्ण कराल. तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा बहरून उठेल. आपण नवीन काही शिकून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कराल. व्यावसायिक जीवनात सुद्धा चांगले यश प्राप्त होईल. 

कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. मित्र मैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. नोकरीत बदलीचे योग आहेत. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल त्यात प्रयत्नात सफलता पूर्वक यश मिळेल. शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम योग आहेत. 

नोकरी व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील त्यातून निश्चित लाभ होईल. कौटुंबिक वातावरण चांगले लाभल्याने प्रगती कराल. कौटुंबिक जीवनात प्रेम व आपुलकी निर्माण होईल.

विशेष शुभ तारिखः ०१,०३,२१,२७,२८,२९.

मीनः महिन्यात नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या वरिष्ठांचा विश्र्वास संपादन करून बढती सुद्धा मिळवू शकतील. व्यापाऱ्यांना प्रसिद्धी व आर्थिक लाभ होईल. करिअर बाबतीत अनेक संधी तुमच्यासमोर येतील. तुमच्या गुणांची प्रशंसा होईल. प्रत्येक काम काळजीपूर्वक केल्याने विशेष लाभाचे संकेत आहेत. 

राजकीय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. नवीन प्रकल्पावर केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. 

व्यापारी वर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम स्वरूपाचा महिना आहे. आपणास जेथून अपेक्षा नसेल अशा ठिकाणाहून सुद्धा चांगला फायदा होण्याची संभावना आहे. आपल्या कामाची प्रशंसा होईल. सहकारी वर्गात आपली प्रतिष्ठा वाढेल.

विशेष शुभ तारिखः ०१,०३,२२,२४,२५,२८.

WhatsApp channel
विभाग