Horoscope April 2024 : ग्रह-नक्षत्राच्या प्रभावात एप्रिल महिना तुमच्यासाठी कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य-horoscope for the month april 2024 see astrology predictions for all zodiac signs ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope April 2024 : ग्रह-नक्षत्राच्या प्रभावात एप्रिल महिना तुमच्यासाठी कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य

Horoscope April 2024 : ग्रह-नक्षत्राच्या प्रभावात एप्रिल महिना तुमच्यासाठी कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य

Apr 22, 2024 06:19 PM IST

Monthly Rashi Bhavishya April 2024 : बारा महिन्यातील चौथा महिना म्हणजे एप्रिल हा तुमच्यासाठी कसा जाईल. यंदा वर्ष २०२४ मध्ये एप्रिल महिना तुम्हाला किती आनंदाचा ठरेल, नशीबाची किती साथ मिळेल जाणून घ्या.

मासिक राशीभविष्य, महिन्याचे राशीभविष्य एप्रिल २०२४
मासिक राशीभविष्य, महिन्याचे राशीभविष्य एप्रिल २०२४

एप्रिल महिन्यात मंगळ आणि बुध वक्री होऊन मीन राशीत तर रवि शुक्र मेष या मंगळाच्या राशीत प्रवेश करणार आहेत. महिन्याच्या सुरुवातीस बुध अस्त होत असुन मध्यान्न काळानंतर अस्त बुधाचा उदय होणार आहे. महिन्याच्या शेवटी बुधही मार्गी होत आहे. वक्री आणि अस्त ग्रहांच्या गतीचा आपल्या राशीनुसार कसा प्रभाव राहील! कसा असेल नववर्षातील पहिला महिना, जाणुन घेऊयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा मासिक राशीभविष्य!

एप्रिल मधील शुभ-अशुभ दिवस.

उत्तम दिवसः ०३,०५,१०,२१,२२,२४,२८.

चांगला दिवसः ०२,१३,१४,१६,१७,१८,२०,२६,२९.

अनिष्ट दिवसः ०७,०८,११,१९,२५,२७,३०.

मेषः 

महिन्यात ग्रहयोग पाहता सुरुवातीस अचानक धनलाभाची संधी मिळेल. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळलेले बरे राहतील. जोडीदाराशी आपले विचार कमी जुळतील. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उपासने मध्ये खंड पाडेल. नोकरदारांनी वरिष्ठांचे म्हणणे ऐकणे जरुरीचे आहे. अन्यथा नोकरीतील बदलास आपणास सामोरे जावे वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे. आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील. प्रयत्नांदी परमेश्वर याचा काहीसा अनुभव आपणास येईल. महत्वाच्या कामासाठी भाग्य आपणा बरोबर असावे लागते याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेणार आहात. मध्यान्न काळानंतर वडिलार्जित इस्टेट आपणास मिळण्याचा योग आहे. आर्थिक प्रगति करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्य जपणे ही नितांत गरजेचे आहे. आपणाला अपेक्षीत असणाऱ्या घटना घडतील. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. मानसिक यातनांना आपणास तोंड द्यावे लगेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याबाबत काळजी घ्या.

चंद्रबलः ०१,०३,०९,१५,२२,२५,२७,२९.

वृषभः 

महिन्यात नवीन योजनेवर कार्य कराल. भावडांशी छोट्याशा कारणाने गैरसमज होऊ देऊ नका. वडिल धाऱ्या मंडळीचा मान राखा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. काही लोक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. संधीचे सोने करा. रोजगारात नविन संधी प्रस्ताव येतील. बढतीचे योग आहेत. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. शत्रुपक्षावर मात कराल. वैद्यकीय व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. आरोग्य उत्तम राहील. व्यापारात फायदा होईल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रवासात लाभ होईल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. कला क्षेत्रातील आर्थिकदृष्या लाभ होणार आहे. घरात आंनदी वातावरण राहील.

चंद्रबलः ०२,०३,०५,०६,०९,१५,२१,२४,२८.

मिथुनः 

महिन्याच्या प्रारंभात बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी जरुर मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीदायक यश मिळणार आहे. आपण केलेले नियोजन सुरळीत पार पडेल. कोर्टकचेरीच्या कामांसाठी काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांमध्ये सहभाग घेतला तर यश मिळेल. नोकरवर्गाने वरिष्ठांशी संयमाने वागावे लागणार आहे. आपली बदली मनाविरुद्ध होण्याची संभावना आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. व्यापार व्यवसायिकांनी भागीदारी न करणे योग्य आहे. व्यापार व्यवसायात आपणाला अपेक्षित फायदा न झाल्यामुळे आपण चिंतीत असाल. भागिदारी व व्यवसायातले व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कर्जामुळे आपणास त्रास जाणवेल. महिन्याच्या मध्यान्न काळानंतर अनुकूल कालावधी असणार आहे. त्यामुळे व्यवसायिक समाधानी असतील. मित्रमंडळीकडून साथ मिळेल. व्यवसायिकांनी व्यवसायात गुंतवलेले भांडवल फायदेशीर ठरेल. नवीन घराची खरेदी करण्यास काळ अनुकूल आहे. प्रेमी युगुलांसाठी काळ अनुकूल आहे. आपले विचार एकमेकांशी कमी जुळतील आपल्या मित्र मैत्रिणीच्या सहकार्यामुळे आपणास यश प्राप्त होईल. जनसंपर्क वाढणार आहे.

चंद्रबलः ०७,१२,१६,१९,२१,२७,२९,३०.

कर्कः 

महिन्याच्या सुरूवातीस अत्यंत अनुकुल राहिल. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नवनविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहे. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा सन्मानाने होईल. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती कामाचा उरक वाढविला पाहिजे. घरातील वरिष्ठांची काळजी आपणाला वाटेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोर्टकचेरीचे काम सहज पार पडतील त्यामध्ये आपणास विरोधकावर मात करता येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. व्यवसायिकांना आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळवून देईल. जमिन विक्रीतून लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. उत्तम मित्र मिळतील. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. आपल्या शांतताप्रिय व न्यायी स्वभावामुळे आपला लौकिक वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या विरूद्ध आपण जात नाही. त्यामुळे बढतीचे योग येतील. हाताखालच्या लोकांकडून आपण चांगले काम करून घ्याल. विद्यार्थ्यांवर्गास अभ्यासाची गोडी लागेल. शत्रूवर विजय मिळेल. आपल्या अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल.

चंद्रबलः ०२,०८,०७,१२,१८,१९,२४,२६,२९.

सिंहः 

महिन्यात स्वभावावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. स्वभाव रागीट होईल. सुखाच्या अपेक्षेने विनाकारण श्रम करीत राहाल. आरोग्य नरम गरम राहील. स्वत:च्या नातेवाईकाकडुन अपमान होण्याची शक्यता आहे. तरूण तरूणीचे विवाहाचे योग आहेत. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. तिच्या आजारपणा मुळे दगदग वाढेल .आपल स्वभाव त्यागी चंचल असा राहील. संतती विषयी चिंता निर्माण होतील. डोळयाचे विकार होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडुन फसवणुक होईल. भागीदारासोबत वादविवाद टाळा. प्रवासात काळजी घ्या. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अपघात भय संभवते. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर नाराज होतील. भागिदार चांगले मिळतील. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे शत्रु निर्माण होतील. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत काहीसी सुधारणा होईल. व्यवसायिकांनी व्यवसायात बेताचीच गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यास उत्तम जमेल. भागिदारी व्यवसाय जपून करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. नियोजीत कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. आर्थिक नियोजानावर लक्ष केंद्रीत करा. अनुकुल वातावरणामुळे आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल.

चंद्रबलः०२,०४,०६,१०,१४,१६,१७,२१,२५,३०.

कन्याः 

महिन्यात आपले मनोधैर्य आणि आत्मविश्वास उंचावलेलं असणार आहे. न कंटाळता कार्यरत राहणे गरजेचे राहील. ठरवलेली उद्दिष्टे साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. काळ भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी राहिल. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नवनविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहे. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. घरातील वरिष्ठांची काळजी आपणाला वाटेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोर्टकचेरीचे काम सहज पार पडतील त्यामध्ये आपणास विरोधकावर मात करता येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. व्यवसायिकांना आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळवून देईल. जमिन विक्रीतून लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. उत्तम मित्र मिळतील. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. आपल्या शांतता प्रिय व न्यायी स्वभावामुळे आपला लौकिक वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या विरूद्ध आपण जात नाही. त्यामुळे बढतीचे योग येतील. आपण आपल्या सहकाऱ्यांकडून चांगले काम करून घ्याल. आपल्या अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल.

चंद्रबलः ०१,०६,१०,१४,१६,१७,२१,२५,३०.

तूळ: 

महिन्यातील ग्रहयोग पाहता प्रॉपर्टीमधुन आर्थिक लाभ होईल. घरातील वातावरण बिघडणार नाही. याबाबतीत काळजी घ्या. व्यवसायिकांनी उद्योगधंद्यात अधिक लक्ष केंद्रीत करावे. आपला इतरांशी स्नेह वाढेल. नोकरदारांना काळ प्रतिकूल आहे. महिला वर्गास प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. वाहन प्रवासात काळजी घेणे जरुरीचे आहे. घरातील मतभेद सामोपचाराने मिटविलेले बरे अन्यथा त्रासदायक जातील. आर्थिक दृष्ट्या त्रास जाणवेल. पतीपत्नीत मतभेद होऊ शकतात. भावंडांशी संयमाने रहावे लागले नाही तर त्यांच्या पासून दूरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेजाऱ्यांशी वादविवाद टाळावे. महत्त्वाचे प्रस्ताव प्रस्थापित करु नये. आरोग्याच्या तक्रारी त्रास देतील. स्वत:च्या वास्तू मध्ये लवकरच आपण प्रवेश कराल. वडिलांची प्रकृती संभाळावी लागेल. वाहन जपून चालविणे. मध्यान्न काळानंतर नोकरीत बढती प्रमोशन मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. मौल्यवान वस्तुंचा संग्रह कराल. कलाकारांना चांगली संधी निर्माण होईल. राजकारणात लाभ होतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. दुरवरचे आणि तीर्थस्थळावर प्रवास घडेल.

चंद्रबलः ०५,०६,०७,१६,१९,२२,२४,२९.

वृश्चिकः 

महिन्यात व्यापारात भागिदारीमुळे आपल्या व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहमान आहेत. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन. त्यामुळे आपण खुष असाल. एकंदरीत ग्रहस्थिती मानसिक स्वस्थ्य उत्तम देणारी आहे. आपल्या समोर नवीन व्यावसायिक प्रस्ताव येतील. संतती योग उत्तम आहे. आपल्या आयुष्यातील अनपेक्षीत शुभप्रद घटना घडतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून बक्षीस मिळेल. तुमच्या कामाचे गोडकौतुक केले जाईल. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. कोर्टकचेरीची कामे सुरळीत पार पाडणारा योग आहे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक काळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील.

चंद्रबलः ०३,०५,०६,०७,१६,१९,२२,२४,२९.

धनुः 

महिना प्रगतीकारक राहील. व्यवसायामध्ये आर्थिक आवक उत्तम प्रकारे आलेली अनुभवास येईल. प्रगतीचा आलेख उंचावलेला असेल. नोकरदारांसाठी ग्रहमान साथ देणार आहे. आपणास प्रिय असणारी नोकरीमध्ये बढतीची बातमी वरिष्ठ आपल्याला देणार आहे. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. स्वत:च्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल. कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे. त्याच बरोबर कामामध्ये विलंब लागण्याची संभावना आहे. प्रवासातून आपणास योग्य दिशा मिळेल. आर्थिक बचत आपण उत्तम प्रकारे करु शकाल. आपल्या समस्येपेक्षा दुसऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी आपण नेहमी तत्पर रहाल. आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे. लांबचे प्रवास आनंद दायक होतील. नोकर वर्गावर विसंबून न रहाणे उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना कमी त्रासाचे राहील.

चंद्रबलः ०८,१३,१५,२३,२४,२६,२७,३०.

मकरः 

महिन्यात रोजगारात व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. परदेशगमनाचे योग आहेत. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. विद्यार्थ्यांना नवनविन क्षेत्रात यश संपादन होईल. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. विद्यार्थी एखादी परकीय भाषा शिकतील. कुंटुबावर व राहत्या घरावर फार प्रेम कराल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेल. अध्यात्मिक उन्नती होईल. पितृ मातृ सुख उत्तम मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. उद्योगात लाभ होईल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. आपण सार्वजनिक चळवळीत आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. व्यसनापासून दूर रहा. व्यवसायिकांसाठी शुभप्रद फळे प्राप्त होतील. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकिय व्यक्तींना मोठा अधिकार प्राप्त होईल.

चंद्रबलः ०२,०६,०८,१०,१२,१५,२५,२७.

कुंभः 

महिन्याच्या सुरुवातीस मनोकामना पूर्ण करणारे योग आहेत. आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारांकडून आपणास आर्थिक आवक मिळेल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. त्याचबरोबर प्रसिद्धीपण मिळेल. आरोग्याच्या तक्रारी किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष नको. महिला वर्गास शासनाकडून सन्मान मिळेल त्याचबरोबर आर्थिक लाभही उत्तम होईल. आपण आपल्या बोलण्यावर संयम ठेवाल तर बऱ्याच समस्या कमी होतील. विद्यार्थ्यांनी चिडखोरपणा वाढू देवू नये. कुटुंबामधून आपणास शुभवार्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. संतती प्राप्तीचे योग उत्तम आहे. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेटीगाठी होतील. आपल्या पराक्रमामुळे समाजात व कुटुंबात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या वर मर्जी ठेवणार आहे. महिलांना काळ अनुकूल आहे. घर खरेदीचा योग आहे. परदेश भ्रमणात फायदा होईल. मित्र मैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

चंद्रबलः ०५,०६,१३,१५,१६,२०,२४,२५,२६.

मीनः 

महिन्यात सुरूवातीस ग्रहयोग पाहता खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. तेव्हा खर्च जपूनच करावा लागणार आहे. प्रॉपर्टी विक्री पासून नुकसान होण्याची संभावना आहे. शेअर्स अधिकची गुंतवणूक सध्या फायदेशीर नाही. प्रेमी युगुलांनी प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपून घेणे गरजेचे आहे. फसवणूकीची संभावना आहे. कर्ज प्रकरणामुळे त्रास होईल. महिला वर्गाने आपले आरोग्य जपणे गरजेचे आहे. शासकिय सेवेत असणाऱ्यांसाठी काळ प्रतिकुल आहे. आपणास अतिशय प्रिय असणारा प्रवास हा दूरचा होणार आहे. नोकरदार नोकरी बदलण्याच्या विचारात असतील तर तूर्तास विचार टाळावेत. सामाजिक प्रतिष्ठेस तडा जाण्याची संभावना आहे. व्यवसायिकांना भागिदारीत सामंजस्य पणाची भुमिकेतुन वाटचाल करावी लागेल. आरोग्याच्या तक्रारी वाढविणारे आहे. कार्यक्रमांमध्ये वस्तूंची जपणूक करणे गरजेचे आहे. मित्र मैत्रिणीं सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. विद्यार्थ्यांनी आळस न करता उत्साहाने अभ्यास करावा लागणार आहे. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळल्या पाहिजेत. घरातील वातावरण एकंदरीत ताणतणावाचे असल्यामुळे आपली आर्थिक स्थिती चिंतादायक असेल. कर्ज काढताना निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे.

चंद्रबलः ०७,११,१४,१६,१७,१९,२६,२८.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

Whats_app_banner