बहुतांश लोकांना सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र घेऊन किंवा इंटरनेटवर जाऊन राशीभविष्य वाचण्याची सवय असते. राशीभविष्यात राशींच्या आधारे भविष्याचा अंदाज बांधला जातो. मात्र अनेकांना माहिती नसेल की, ग्रहांच्या हालचालींवरुन राशींचे भविष्य ठरत असते. ग्रह एका ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलत असतात. अशावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यालाच गोचर किंवा संक्रमण असे म्हटले जाते. ग्रहांच्या गोचरमधून अनेक शुभ-अशुभ योग घटित होतात. या योगांचा परिणाम राशींवर पडतो. यामध्ये काही राशींना सकारात्मक बदल पाहायला मिळतात तर काही राशींना नकारात्मक बदल दिसून येतात.
ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्यात ग्रहांचा देवता सूर्य आणि धन देवता शुक्र कर्क राशीत गोचर करणार आहेत. त्यांच्या एकत्र प्रवेशाने कर्क राशीत संयोग दिसून येईल. विशेष म्हणजे तब्बल ५ वर्षांनंतर या दोन्ही ग्रहांचा कर्क राशीत संयोग होणार आहे. शुक्र आणि सूर्याच्या या संयोगाने राशीचक्रातील काही राशींवर अत्यंत शुभ प्रभाव पडणार आहे. या प्रभावित त्या राशींची भरभराट होऊन त्यांना सुखाचे दिवस येतील. तर या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
तब्बल ५ वर्षांनंतर होणाऱ्या सूर्य आणि शुक्राच्या युतीचा लाभ कर्क राशीच्या लोकांना होणार आहे. ही युती कर्क राशीच्या लग्न भावावर होत असल्याने तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. याकाळात तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. बौद्धिक आणि वैचारिक क्षमता वाढेल. पैसे कमविण्याचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. मनात ठरविलेल्या योजना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळेल. उद्योग-व्यवसायात आर्थिक लाभ होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक आयुष्यात उत्साह आणि आनंद निर्माण होईल. भागीदारीच्या व्यवसायात लाभ मिळेल.
सूर्य आणि शुक्र संयोगाचा लाभ कन्या राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. कन्या राशीत हा संयोग इन्कम आणि लाभ या घरात होत असल्याने तुमच्या कमाईत वाढ होणार आहे. आकस्मिक पैसे आल्याने मन प्रसन्न होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक केल्यास लाभ मिळेल. नोकरदार वर्गाला कामात चांगली प्रगती दिसून येईल. वैवाहिक आयुष्यात सुरु असलेले वाद याकाळात संपुष्ठात येतील. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा मिळणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहील.
कर्क आणि कन्या राशीप्रमाणेच सूर्य-शुक्राच्या युतीचा लाभ तूळ राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. तूळ राशीसाठी ही युती कर्म घरात होणार आहे. त्यामुळे याकाळात तुम्हाला उद्योग-व्यवसायात प्रगती झालेली दिसून येईल. नोकरदार वर्गाने पुरेसे लक्ष केंद्रित केल्यास मोठे यश पदरात पडणार आहे. शिवाय तुमच्या महत्वाच्या कामात मदत मिळेल. बेरोजगारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचा योग आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.