आज मंगळवार ९ एप्रिल रोजी, चैत्र महिनारंभ, चैत्र नवरात्रारंभ तसेच गुढीपाडवा असून, चंद्र मीन राशीत संक्रमण करत आहे. किंस्तुघ्न करणात व वैधृती योगात मराठी नववर्षाची सुरवात कशी होईल, कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
आज एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. आर्थिक आघाडी वर प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधगिरी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल.
आज कामांना न्याय देण्यासाठी जीवाचे रान कराल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. उत्तम धनप्राप्ती होईल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील.
आज फायद्याचे प्रमाण वाढेल. आत्मविश्वास उत्तम असल्यामुळे कोणत्याही समस्येला सामोरे जाल. तरुण वर्गात नवीन ओळखी होतील आणि त्याचे रुपांतर प्रेमात होऊ शकेल. घरासंबंधी समस्या होऊ शकते. मौल्यवान वस्तु चोरीला जाण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. प्रकृतीची विशेष काळजी घ्या.
आज नोकरीत थोडा दूरदर्शी पणा ठेऊन त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृती कडे दूर्लक्ष करून चालणार नाही. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. नवनविन प्रलोभने येत राहतील. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील.
आज उलाढाल करत राहाल. प्रवासात काळजी घ्यावी. नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. वाहन, घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. विद्याभ्यासात प्रगती कराल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
आज नोकरी व्यवसायात आपल्या कामाच्या पद्धतीत बदल कराल. गोड बोलण्यावर भर ठेवाल. तुम्ही स्वत: ज्या गोष्टींचे चिंतन कराल त्यातून भरीव काहीतरी निर्माण करून फायदे मिळवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. आनंददायी वातावरण राहील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होऊ शकते. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील.
आज संधी न मिळाल्यामुळे संभ्रमात पडाल. घरातील लोकांना तुमचे विचार योग्य तऱ्हेने पटवून द्याल. कामाला जास्त महत्त्व द्याल. खूप नकारात्मक विचार मनात येतील, त्यांना सकारात्मक बनवलेत तर कामे पुढे जातील. मनावरचा ताण बर्यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा.
आज भाग्याची साथ चांगली मिळेल. उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.
आज करिअरमध्ये खूप कष्ट करावे लागतील. आरोग्य बिघडू शकते. स्थावर इस्टेटीचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोर्टकचेरीच्या कामामध्ये अडचणी वाढतील. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. माणसं दुरावली जातील अशी वर्तणुक टाळावी. काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जुनी येणी रखडतील. फसवणूक आर्थिक हानी संभवते. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
आज विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. मनात उदासिनता वाढेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका.
आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. मनोधैर्य सांभाळा. विचारा अंतीच निर्णय घ्या. गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळ पणाने कोणत्याही गोष्टी करू नका. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृति अस्थिर राहील. क्षणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका.
आजचा नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील. इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. चिडचिडेपणा वाढेल. उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्या सारख्या घटना घडतील. खर्चाने मन व्यथित होईल.
संबंधित बातम्या