मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Saubhagya Yog 2024 : सुखाचे दिवस येणार! सौभाग्य योगात ३ राशींवर होणार धनवर्षाव,उघडणार भाग्य

Saubhagya Yog 2024 : सुखाचे दिवस येणार! सौभाग्य योगात ३ राशींवर होणार धनवर्षाव,उघडणार भाग्य

HT Marathi Desk HT Marathi
Jun 28, 2024 01:14 PM IST

Saubhagya Yog : हिंदू पंचांगानुसार आज आषाढी कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीचा दिवस आहे. शिवाय आज ग्रहांच्या विविध हालचाली घडून येत आहेत. या हालचालींमधून अनेक योगसुद्धा जुळून येत आहेत. ग्रहांच्या राशी परिवर्तनातून आज शोभन योग, रवी योग, सौभाग्य योग असे विविध शुभ योग निर्माण झाले आहेत.

Saubhagya Yog 2024 : सुखाचे दिवस येणार! सौभाग्य योगात ३ राशींवर होणार धनवर्षाव,उघडणार भाग्य
Saubhagya Yog 2024 : सुखाचे दिवस येणार! सौभाग्य योगात ३ राशींवर होणार धनवर्षाव,उघडणार भाग्य

एका ठराविक काळानंतर ग्रह आपले स्थान बदलत असतात. यालाच गोचर असे म्हणतात. याकाळात ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. आजसुद्धा ग्रहांच्या राशीबदलातून सौभाग्य योग जुळून आहे. दरम्यान सौभाग्य योगाचा फायदा राशीचक्रातील काही राशींना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबाबत आपण जाणून घेऊया.

मिथुन

आज तुम्हाला जोडीदाराकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. ज्यामुळे तुमची निश्चितच प्रगती होईल. तुमचे मन प्रसन्न राहील. मालमत्तेसंबंधी असलेले वाद आज संपुष्ठात येतील. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक असेल. शिवाय तुमचा संपूर्ण दिवस कलात्मक आणि सर्जनशील कार्य पूर्ण करण्यात जाऊ शकतो. तुमच्या आवडीचे काम कराल. त्यातून तणाव दूर होण्यास मदत होईल. आकस्मिक धनलाभ होईल. पैसे हातात आल्याने आर्थिक स्थिती भक्कम राहील. नोकरदार वर्गाला पगारवाढ मिळू शकते. भूतकाळात केलेलया गुंतवणुकीतून आज फायदा मिळेल.

मेष

आज सौभाग्य योगात ग्रहमान अनुकुल असल्याने नवीन प्रॉपर्टीसंबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. संशोधन क्षेत्रात काम करणारांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भावंडांकडून आर्थिक मदत मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभ होईल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक केल्यास आज लाभ मिळेल. व्यवसायिकांना आज मोठा आर्थिक लाभ होईल.

धनु

आज सौभाग्य योगात आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे. व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील लोकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ कराल. पैशांची चणचण दूर होईल.

WhatsApp channel
विभाग