Horoscope 25 April 2024 : आज चैत्र कृष्ण द्वितीया, दिवस अडचणीचा राहील की लाभाचा? वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope 25 April 2024 : आज चैत्र कृष्ण द्वितीया, दिवस अडचणीचा राहील की लाभाचा? वाचा राशीभविष्य!

Horoscope 25 April 2024 : आज चैत्र कृष्ण द्वितीया, दिवस अडचणीचा राहील की लाभाचा? वाचा राशीभविष्य!

Published Apr 25, 2024 09:51 AM IST

Horoscope 25 April 2024 : आज २५ एप्रिल २०२४ गुरुवार रोजी, चैत्र कृष्ण द्वितीया असून आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

राशीभविष्य २५ एप्रिल २०२४
राशीभविष्य २५ एप्रिल २०२४ (Freepik)

आज गुरुवार २५ एप्रिल रोजी, चैत्र कृष्ण प्रतिपदेनंतर द्वितीया तिथी असून, विशाखा नक्षत्र आणि व्यतिपात योग आहे. आज चंद्र तूळ राशीत संक्रमण करणार आहे. तैतील करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष: 

आज सर्व कामे एकट्याने करणे शक्य नसल्यामुळे इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. 

वृषभ: 

आज जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. आनंददायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील.

मिथुन: 

आज मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कर्क: 

आज ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण कराल. उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. कुटुंबात शुभवार्ता मिळेल.

सिंह: 

आज करिअरमध्ये खूप कष्ट करावे लागतील. गुप्त शत्रू डोके वर काढतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. स्थावर इस्टेटीचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोर्टकचेरीच्या कामामध्ये अडचणी वाढतील. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क राहा. 

कन्या: 

आज मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. मनाविरुद्ध कार्य घडतील.

तूळ: 

आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील. मनोधैर्य सांभाळा. अविचारीपणा योग्य नाही. विचारा अंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. कर्जाचा बोजा वाढू शकतो. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. क्षणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. उष्णतेचे विकार उद्‌भवतील. आरोग्याच्या तक्रारी राहतील. 

वृश्चिकः 

आज आर्थिक बाबतीत प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. रागावर मात्र नियंत्रण ठेवा.

धनु: 

आज कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील. प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी राहाल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. आपल्या कुवतीपेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. 

मकर: 

आज विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांना विशेष संधी मिळतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. प्रयत्नात उत्तम यश मिळेल.

कुंभ: 

आज घरासंबंधी समस्या होऊ शकते. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. वाहन जपून चालवा. अपघात भय संभवते. 

मीन: 

आज कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. व्यापारात काळजी पूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. मोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील. 

Whats_app_banner