मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope 24 April 2024 : आज चैत्र कृष्ण प्रतिपदा, बुधवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Horoscope 24 April 2024 : आज चैत्र कृष्ण प्रतिपदा, बुधवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 24, 2024 09:05 AM IST

Horoscope 24 April 2024 : आज २४ एप्रिल २०२४ बुधवार रोजी, चैत्र कृष्ण प्रतिपदेचा आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

राशीभविष्य २४ एप्रिल २०२४
राशीभविष्य २४ एप्रिल २०२४

आज बुधवार २४ एप्रिल रोजी, चैत्र कृष्ण प्रतिपदा असून, स्वाती नक्षत्र आणि सिद्धी योग आहे. आज चंद्र तूळ राशीत संक्रमण करणार आहे. बालव करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेषः 

आज कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. कार्यक्षेत्रात वृद्धी होईल. जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभेल. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून लाभ होईल. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होईल. आनंदी व ऊत्साही दिवस राहील. मनात प्रसन्नता असेल.

वृषभः 

आज मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. 

मिथुनः 

आज चंचलं बनाल. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. ताणतणाव वाढेल. चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाव राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करणे टाळा. कामात खुप मेहनत घ्यावी.

कर्कः 

आज नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत. मतभेद निर्माण होऊ शकतात. नोकरीत केलेली चुकू महागात पडेल. कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. शासकीय सेवेत प्रलोभनांना बळी पडू नये. कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा. व्यापारात कर्जप्रकरणे नामंजूर होतील. कर्ज घेणे देणे टाळावे. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. अपघात भय संभवते. 

सिंहः 

आज कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. स्वत:चे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. 

कन्याः 

आज देश-विदेशात फिरण्याचे योग आहेत. घरामध्ये अचानक उद्भभवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. व्यवसायात अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यापारात आर्थिक प्रगती होईल. 

तूळ: 

आज प्रत्येक काम पूर्ण करणार आहात. रचनात्मक कामाकडे ओढ राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. सामाजिक क्षेत्रात काम कराल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. उद्योग व्यापार तेजी राहील. आपली आर्थिक बाजु भक्कम राहील. कौटुंबीक वातावरण आनंददायी राहील.

वृश्चिकः 

आज नवीन कामाची आखणी कराल. कलाकरांना संधी मिळतील. कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. आत्मविश्वास वाढल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण व भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. व्यवसायात तेजी राहील. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.

धनुः 

आज द्विधा मन:स्थितीमुळे तुमचा घोटाळा होऊ शकतो. कामे उलटपालट होऊन जातील. अतिरिक्त राग आणि वादविवाद टाळा. नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. शारिरिक व्याधी उद्‌भवतील. 

मकरः 

आज कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. यामुळे रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग राहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. व्यापारात प्रगतीकारक दिवस असुन अचानक आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

कुंभः 

आज नवीन प्रॉपर्टी संबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील. पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहमान आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल.

मीनः 

आज आर्थिक कामे मनासारखी घडतील. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आपपल्या क्षेत्रात योग्य गुरूवर्य मंडळी भेटतील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. 

WhatsApp channel