आज मंगळवार २३ एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल पौर्णिमा असून, चित्रा नक्षत्र आणि वज्र योग आहे. आज चंद्र कन्या राशीनंतर सिंह राशीत संक्रमण करणार आहे. विष्टि करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
आज आर्थिक आवक चांगली राहील. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे बेत ठरतील. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील.
आज चांगली कामे मिळतील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. नवीन योजना राबवाल. बौद्धीक आणि मानसिक प्रगती होईल. नावलौकिक मिळेल. रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. अडचणी निर्माण होतील. आज व्यवहारात सावधपणा बाळगा. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे.
आज जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ मिळेल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. कामात उत्साह वाढणार आहे. मालमत्ता संबंधी प्रश्न मार्गी लागतील. जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल.
आज तब्येत चांगली ठेवा. पायाची दुखणी होऊ शकतात. संसारात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल. स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागले तरी त्यात तडजोडही करावी लागेल. प्रवास आवश्यक असेल तरच करा. प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. सन्मान व किर्ती डागळण्याची शक्यता आहे. खर्च विचारपूर्वक करावा. सरकारी कामे रखडतील. मनस्ताप होईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. नोकरीत कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल.
आज चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष रहातील. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवासातून लाभ होईल, मौजमजा करण्याकडे कल राहील.
आज थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल. अवास्तव गोष्टींकडे जास्त आकर्षित व्हाल. खूप सद्भावनेने एखादी गोष्ट करायला जावी आणि पदरी फक्त वाईटपणा यावा असा अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यापारात व नोकरीत रागावर नियंत्रण ठेवा. संयम बाळगुन काम करा. प्रसिद्धी आणि यश मिळयाची शक्यता आहे.
आज नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल. त्याचा फायदा कामासाठी होईल. पैसे मिळाले तरी ठरवलेल्या कारणासाठीच पैसा खर्च कराल. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग करून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. काळजीपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक लाभ होईल. महत्वकांक्षा पूर्ण होतील.
आज कामकाजामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. व्यापारात नवीन कार्याची योजना आखाल. नोकरीतील नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. कार्यक्षेत्रात लाभ होणार असून, आर्थिक आवक वाढेल.
आज वडिलोपार्जित धंद्यामध्ये वाढ कराल. किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. प्रियजनांची गाठभेट होईल. उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. आत्मविश्वास वाढल्याने कठीण पेचप्रसंगावर सहज मात कराल. व्यापार रोजगार चांगला चालेल.
आज नोकरीमध्ये कोणावरही अवलंबून राहू नये. स्वत:ची कामे स्वतः करावीत. मनात नैराश्य निर्माण होईल. विचारपूर्वक निर्णय घ्या. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. खर्चामध्ये वाढ होईल. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या. वाहन सावकाश सांभाळुन चालवा. अपघात भय संभवते. कुटुंबातील खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
आज अध्यात्म आणि भक्तिमार्गाकडे वळाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. नोकरीत प्रगती होण्याचे संकेत मिळतील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल. विचारपूर्वक कामे केली तर आजचा दिवस चांगला जाईल.
आज जवळच्या लोकांची मने दुखावली जातील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. व्यवसायात जास्त भांडवलाची गरज भासेल. कुटुंबातील सदस्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. संततीची चिंता सतावेल. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढणार आहे. दुरवरचे प्रवास टाळावेत. आर्थिक नुकसान होऊ शकतो. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत.
संबंधित बातम्या