मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope 22 April 2024 : आज चैत्र शुक्ल चतुर्दशी, सोमवारचा दिवस तुम्हाला ठरेल खास! वाचा राशीभविष्य

Horoscope 22 April 2024 : आज चैत्र शुक्ल चतुर्दशी, सोमवारचा दिवस तुम्हाला ठरेल खास! वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 22, 2024 10:47 AM IST

Horoscope 22 April 2024 : आज २२ एप्रिल २०२४ सोमवार रोजी, चैत्र शुक्ल चतुर्दशीचा आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

राशीभविष्य २२ एप्रिल २०२४
राशीभविष्य २२ एप्रिल २०२४

आज सोमवार २२ एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल चतुर्दशी असून, हस्त नक्षत्र आणि हर्षण योग आहे. आज चंद्र कन्या राशीत संक्रमण करणार आहे. गरज करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेषः 

आज गुंतवणूक करायला हरकत नाही. व्यसन कमी करण्याचा प्रयत्न करा. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. 

वृषभः 

आज अडलेली कामे मार्गी लागतील. शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होऊ शकते. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. प्रवास टाळा.

मिथुन: 

आज किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पाहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. मनासारख्या घटना घडतील. भरभराट होण्याची शक्यता असून, आकस्मिक धनलाभ होईल. आर्थिक प्रगतीचा दिवस ठरेल. मन प्रसन्न राहील.

कर्कः 

आज आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. अती संवेदनशील असल्यामुळेच थोडा तापट पणाही वाढेल. व्यवसायात धाडसाची कामे कराल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. नावलौकिक वाढेल. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल.

सिंहः 

आज वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. खर्चाचा आकडा थोडा वाढेल. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळा. कोणाला जामीनही राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. मनस्ताप करावा लागेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. 

कन्याः 

आज महत्त्वाची कामे रखडतील. तारेवरची कसरत करावी लागेल. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. कायद्याच्या चौकटीत राहुन कामे करावीत. नियम बाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. गुंतवणूक करू नका. 

तूळ: 

आज मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. मनःस्वास्थ्य हरवून बसाल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. 

वृश्चिकः 

आज गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. विवेक ठेऊन वेळीच सावध राहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. मनासारखा खर्च कराल.

धनुः 

आज अडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील, त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम दिवस आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. घरासंबंधी समस्या दूर होतील. 

मकर: 

आज जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील, अचानक लाभ होण्याचे योग आहेत. भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. भरभरटीचा दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ:

आज सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. कौटुंबिक वातावरण निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. व्यसनापासून सावध राहा. फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

मीनः 

आज सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. अडचणी सोडवाल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. धाडसी निर्णय घ्याल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील. घरगुती वातावरण चांगले राहील. 

WhatsApp channel