आज रविवार २१ एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल त्रयोदशी असून, उत्तराफाल्गुनी नक्षत्र आणि व्याघात योग आहे. आज चंद्र कन्या राशीत संक्रमण करणार आहे. कौलव करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
आज धंद्यात चांगली प्रगती कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आरोग्याच्या थोडयाफार समस्या उद्भवतील.
आज कलाकारांना वाव मिळेल, कला सादर करण्याची संधी मिळेल, कौतुकास पात्र ठराल. समयसूचकता दिसून येईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जीवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल.
आज परदेशी गोष्टी खरेदीचे योग येतील. स्वच्छंदीपणा थोडी स्वार्थी वृत्ती ठेवणार आहात. घरामध्ये तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. आर्थिक निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतील. पराकोटीच्या भावनांना सामोरे जाणार आहात. मानसिक स्वास्थ सांभाळा. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. कर्ज प्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही.
आज ज्ञान आणि धडाडी यांच्या जोरावर सर्व गोष्टी तडीस न्याल. घरामध्ये अचानक एखाद्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल. भाग्याची साथ चांगली मिळेल. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा.
आज धार्मिक गोष्टींमध्ये पैसा खर्च कराल. कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधाच्या कामाला गती येईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.
आज शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. वातावरण उत्साही आनंदी राहिल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील.
आज प्रत्येक काम फत्ते करणार आहात. संयमाची कसोटी तुम्हाला सांभाळावी लागेल. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.
आज अतीआत्मविश्वासामुळे तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची कला नजरेत भरण्यासारखी समोर येईल. घरामध्ये स्फूर्तीदायक वातावरण निर्माण होईल. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. मनावर नियंत्रण ठेवून संयम राखावा.
आज आर्थिक व्यय होण्यासाठी कारणीभूत ठरेल. परदेशगमनाचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण होईल. बौद्धीक क्षेत्रात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. पाठीची दुखणी डोके वर काढतील. व्यायाम आणि औषधोपचार या दोहोंची साथ मिळेल. प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल.
आज व्यापारात आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे खर्च वाढेल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन मनानाची गोडी वाढेल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रवासात विशेष काळजी घ्यावी लागेल.
आज प्रकृती स्वास्थ्यात सुधारणा झाली तरी अचानक काही तक्रारी उद्भवल्यामुळे मन:स्वास्थ्य मिळणार नाही. घरात चैनीच्या गोष्टी खरेदी केल्यामुळे खर्चात वाढ होईल. कामाच्या दृष्टीकोनातून कष्टदायक दिवस असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील.
आज जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक फायदा चांगला होईल. स्थावर इस्टेटी संबंधी अचानक काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. स्वत:ची कामे स्वतःच केलेली बरी पडतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.
संबंधित बातम्या