मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope 17 April 2024 : आज चैत्र शुक्ल नवमी, बुधवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Horoscope 17 April 2024 : आज चैत्र शुक्ल नवमी, बुधवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 17, 2024 04:01 PM IST

Horoscope 17 April 2024 : आज १७ एप्रिल २०२४ बुधवार रोजी, चैत्र शुक्ल नवमीचा आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

राशीभविष्य १७ एप्रिल २०२४
राशीभविष्य १७ एप्रिल २०२४

आज बुधवार १७ एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल नवमी असून, आश्र्लेषा नक्षत्र आणि शूल योग आहे. आज चंद्र कर्क राशीत संक्रमण करत आहे. तैतील करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष: 

आज आपले प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे. आर्थिक घडी चांगली बसेल. कामाची गती वाढेल. कार्यक्षेत्रात भरभराट होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. भागीदाराकडून मदत मिळेल. फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील. यशस्वी व्हाल.

वृषभः 

आज नोकरी व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. जेवढी कामे उरकता येतील तेवढी उरकणार आहात. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. भरभराटीचा दिवस आहे.

मिथुन: 

आज आरोग्याबाबतीत काळजी घ्या. मानसिकता बिघडल्यामुळे काही गोष्टींना खीळ बसण्याची शक्यता आहे. मुलांशी मतभेद होतील. अती भावनाप्रधानता टाळायला हवी. जोखमीचे निर्णय घेणे टाळावे. मानसिक क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. 

कर्कः 

आज एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. कोणतीही टोकाची भूमिका घेण्याअगोदर सुवर्णमध्य काढावा लागेल. नोकरीत अनुकुलता जाणवेल. यश मिळेल. लाभ होईल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. 

सिंह: 

आज आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल. प्रवासयोग परदेशी जाण्यासंबंधात काही कामे अडली असतील तर ती पार पडतील. निश्चितच कामकाज किंवा रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळू शकतो. 

कन्याः 

आज मानसिक स्वास्थ लाभेल. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. भाग्योदयकारक दिनमान आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. 

तूळ: 

आज जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. प्रवास नुकसानकारक राहील. 

वृश्चिकः 

आज कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. 

धनु: 

आज नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. स्फूर्तिदायक घटना घडल्यामुळे कामामध्ये एक प्रकारची गती जाणवेल. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 

मकर: 

आज विचार पूर्वक निर्णय घ्या. कलाकारांना चांगला वाव मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळावे. लोकांची दाद चांगली मिळेल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. 

कुंभ: 

आज कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रेमीजनांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. नोकरी व्यवसायात कष्टाची बाजी लावाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. मनोबल उंचावलेले असेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. 

मीन: 

आज अस्थिरता जाणवेल. परदेशात प्रवास करावे लागतील. कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. बोलण्यातील संभ्रम दूर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. 

WhatsApp channel