आज मंगळवार १६ एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल अष्टमी असून, पुष्य नक्षत्र आणि धृति योग आहे. आज चंद्र कर्क राशीत संक्रमण करत आहे. बालव करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
मेष:
आज लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. अविचारीपणा योग्य नाही. विचारा अंतीच निर्णय घ्या. लोकांची मने दुखावली जातील. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. त्यामुळे पथ्यपाणी सांभाळणे हिताचे ठरेल. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. कार्यक्षेत्रात गैरसमज पसरणार नाही याची काळजी घ्या. कर्जाचा बोजा वाढू शकतो. गुंतवणुक करू नका. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते.
आज पैसा खर्च करावा लागू शकतो. जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. मनात एक प्रकारची खिन्नता राहील. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. खर्चाने मन व्यथित होईल. चिडचिडेपणा वाढेल. प्रवास टाळा.
आज कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. कुटुंबात शुभवार्ता मिळेल.
आज वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद निर्माण होतील. अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. नोकरीत नवीन कल्पनांचा वापर करून कामाचे नियोजन कराल. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक नुकसान होऊ शकते. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील.
आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात तडजोड करावी लागेल. आर्थिक समाधान मिळाल्यामुळे स्वस्थ राहाल. थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कठीण प्रसंगाशी झगडावे लागेल.
आज प्रवासाचे बेत आखले जातील. वैवाहिक जीवनात घरातील वातावरण आनंदी राहील. वरिष्ठांची मर्जी राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. नावलौकिक वाढेल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
आज प्रयत्न यशस्वी ठरतील. प्रमोशन मिळण्याचे योग येतील. जुनी येणी वसूल होईल. पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. नातेवाईकांकडून व मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ मिळेल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील.
आज आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या. कोणत्याही कामाचे नियोजन करण्यात कमी पडण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारावर जास्त विश्वास टाकणे योग्य ठरणार नाही. आर्थिक विवंचना थोडी सतावेल. मौल्यवान वस्तु हरवण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा.
आज आर्थिक बाबतीत प्रगती होईल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. नोकरी लागण्याची संधी उपलब्ध होईल. आर्थिक तरतूद होणार आहे. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा.
आज बौद्धिक क्षमता सिद्ध कराल. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरणार आहे. जोडीदाराचे सहकार्य उत्तम राहील. नोकरी व्यवसायात हव्या असलेल्या संधी मिळतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. व्यापारात काळजी पूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. मोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
आज खर्चिक आणि उधळ्या स्वभावाला आळा घालावा लागेल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत मानाच्या जागा मिळतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल.
आज अनावश्यक चिंता तुमचा पाठलाग करतील. अपेक्षा भंग होईल. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. प्रवास होईल.
संबंधित बातम्या