आज सोमवार १५ एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल सप्तमी असून, सुकर्मा योग आहे. आज चंद्र मिथुन राशीत संक्रमण करत आहे. विष्टि करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
आज वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. प्रत्येक वेळी स्वत:च्या पद्धतीनेच काम करण्याच आग्रह न ठेवता दुसऱ्यांचा विचार करणे आवश्यक ठरेल. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. जुनी येणी अचानक वसूल होतील. गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे.
आज संततीकडून चांगल्या बातम्या मिळणार आहेत. मोठे प्रवासाचे योग येतील. कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. नव नविन संधी मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागेल. जबाबदारीने काम करा. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
आज वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. यशाचा आनंद मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील.
आज कलाकारासाठी फायदेशीर दिवस आहे. काम पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. पटकन एखादा निर्णय घेण्याचा अविचारही हातून घडू शकतो. तज्ञ व्यक्तींचे सल्ले मात्र उपयोगी पडतील. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढेल. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागतील. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. कामाचा व्याप वाढेल.
आज आपले आरोग्य जपा. मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. मनस्तापाच्या घटना अनुभवास येतील.
आज घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. मुलांच्या करिअर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. काळजीपूर्वक काम करावे लागेल. फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका.
आज सकारात्मक विचारामुळे उत्साह वाढेल. वैवाहिक जीवनात तर याचे महत्त्व फारच राहील. फायदेशीर व्यवहार करता येतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित यश संपादन करता येईल. आर्थिक आवक वाढेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे गरजेचे राहील.
आज जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. आर्थिकदृष्या लाभ होईल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील.
आज कर्जफेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर राहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. कुटुंबातील वातावरण समाधानी राहील. आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहील.
आज ध्येयापासून विचलीत होऊ नका. कर्जप्रकरण काळजीपूर्वक हाताळा. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणावात्मक राहील. व्यवसायिकांचे उद्योगधंद्यात लक्ष कमी होईल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा.
आज फायदा होईल. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. जगा वेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. नावलौकीक सांभाळण्याचा प्रयत्न करा.
आज चांगली कामे मिळतील. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष राहतील. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. वारसाहक्काने धन व संपत्ती लाभेल. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.