मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope 14 April 2024 : आज चैत्र शुक्ल षष्ठी, रविवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Horoscope 14 April 2024 : आज चैत्र शुक्ल षष्ठी, रविवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 14, 2024 10:14 AM IST

Horoscope 14 April 2024 : आज १४ एप्रिल २०२४ रविवार रोजी, चैत्र शुक्ल षष्ठीचा आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

राशीभविष्य १४ एप्रिल २०२४
राशीभविष्य १४ एप्रिल २०२४

आज रविवार १४ एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल षष्ठी असून, पद्मक योग आहे. आज चंद्र मिथुन राशीत संक्रमण करत आहे. गरज करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष: 

आज मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत. आर्थिक व्यय होण्याची जास्त संभावना आहे. कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

वृषभः 

आज गुंतवणूक करायला हरकत नाही. आर्थिक लाभाची शक्यता आहे. प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील.

मिथुनः 

आज नुकसान होऊ शकते. धैर्याने आणि संयमाने काम करा. महत्त्वाची कामे रखडतील. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायद्याच्या चौकटीत राहुन कामे करावीत. अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल.

कर्कः 

आज आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल. धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. नावलौकिक वाढेल. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. 

सिंहः 

आज वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. साथीदारांच्या कामावर लक्ष असु द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या.

कन्याः 

आज अडलेली कामे मार्गी लागतील. शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ सांभाळा. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका.

तूळ: 

आज उधारी वसूल होईल. कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. आपल्या मतावर ठाम राहाणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील. 

वृश्चिकः 

आज घरातील अनेक अडचणी सोडवाल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील. 

धनुः 

आज कौटुंबिक वातावरण निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध रहा. व्यसनी मित्रांपासून दुर रहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. आरोग्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.

मकरः 

आज दिवस मंगलमय आहे. गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. प्रेम प्रकरणात यश येईल. जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. वेळीच सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. किर्ती व मान सन्मान मिळेल. 

कुंभः 

आज किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पाहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. मनासारख्या घटना घडतील. 

मीनः 

आज अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. मन समाधानी राहील. 

WhatsApp channel