आज शनिवार १२ एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल पंचमी असून, श्री लक्ष्मी पंचमी आहे. आज चंद्र वृषभ राशीत संक्रमण करत आहे. कौलव करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्या. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. दिवस कष्टदायक असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील.
आज काही करण्याची खूप स्वप्ने रंगवली असतील, तर त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वाद विवाद टाळा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका.
आज कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. प्रेमीजनांना प्रेमप्रकरणातअडथळे संभवतात. कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल.
आज प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. सामाजिक कार्यात रस घ्याल. सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मक परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल.
आज हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. एखाद्या गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील, परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल राहील. लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. प्रसन्न वातावरण राहील.
आज उत्साही वातावरण लाभेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. तुम्हाला चैन पडणार नाही. कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल व मन प्रसन्न राहील.
आज आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल.
आज थोडी तडजोड करावी लागेल. भावंडांशी मतभेद संभवतात. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचनाची गोडी वाढेल. कुंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारानिमित्त प्रवास होईल. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
आज कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. मनासारखी कामे होतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.
आज तब्येत खूष राहील. लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रवास फायदेशीर होईल. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती, मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.
आज मुलांच्या आवाक्याबाहेरच्या मागण्यांमुळे वैतागुन जाल. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल.
आज कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.
संबंधित बातम्या