मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope 11 April 2024 : आज गौरी तृतीया, गुरुवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Horoscope 11 April 2024 : आज गौरी तृतीया, गुरुवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 11, 2024 11:10 AM IST

Horoscope 11 April 2024 : आज ११ एप्रिल २०२४ गुरुवार रोजी, चैत्र शुक्ल तृतीयेचा आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

राशीभविष्य ११ एप्रिल २०२४
राशीभविष्य ११ एप्रिल २०२४

आज गुरुवार ११ एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल तृतीया असून, मत्स्य जयंती व गौरी तृतीया आहे. आज चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत संक्रमण करत आहे. वणिज करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेषः 

आज तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात विस्तार होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

वृषभः 

आज वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. दिवस कष्टदायक असणार आहे. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. नातेसंबंधाविषयी मनात कटुता निर्माण होऊ शकते. 

मिथुनः 

आज काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. स्वभावात निष्काळजीपणा राहील. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. भागीदाराची मदत घ्यावी लागेल. 

कर्कः 

आज तब्येत खूष राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती, मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. 

सिंहः 

आज कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. प्रेमीजनांना प्रेमप्रकरणात अडथळे संभवतात. कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वृद्धी होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वादविवाद मात्र टाळा.

कन्याः 

आज प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. प्रसिद्धी मिळवाल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. 

तूळ: 

आज संततीच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न होईल. हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. 

वृश्चिक: 

आज कोणत्याही गोष्टीपेक्षा प्रयत्नाला महत्त्व द्यावे लागेल. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. स्वभावात राग उत्पन्न होऊ शकतो. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. 

धनु: 

आज कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळू शकतात. निद्रानाशाचे विकार उद्भवू शकतात. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. पत्नी व संततीशी मधुर संबंध राहतील. 

मकरः 

आज आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कोणाचाही द्वेष करू नका. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. मान-सन्मान मिळेल.

कुंभः 

आज आर्थिक स्थिती सुधारेल. कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न नफेचे ठरतील. विद्यार्थ्यांची अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. गुंतवणूक लाभ देणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य लाभेल.

मीनः 

आज वैवाहिक जीवनात थोडी तडजोड करावी लागेल. भावंडांशी मतभेद संभवतात. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. विद्याभ्यासात प्रगती होईल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. कामाचा ताण जाणवेल. व्यापारानिमित्त प्रवास होईल. 

WhatsApp channel