आज बुधवार १० एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल द्वितीया असून, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. आज चंद्र मेष राशीत संक्रमण करत आहे. बालव व तैतील करणात व विष्कंभ योगात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!
आज उत्पन्नाताचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. सामाजिक क्षेत्रात काम कराल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. उद्योग व्यापार तेजीत राहील. भाऊबहिणीसी सलोख्याचे संबंध राहतील. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत दिवस उत्तम आहे.
आज कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. चिकाटी जिद्द आणि स्थैर्य कामी येईल. चांगली संधी निर्माण होईल. उद्योग व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. विद्याभ्यासात प्रगती राहील.
आज यश निश्चित लाभेल. खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागतील. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल राहील. चांगल्या भावनेने काम करा. आर्थिक प्रगती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल.
आज अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. आनंदी व ऊत्साही दिवस राहील. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल.
आज रोजगारात नवीन कामाची आखणी कराल. कलाकरांना संधी मिळतील. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील . व्यापार व्यवसायात तेजी राहील. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. कामाचे कौतुक होईल.
आज द्विधा मन:स्थितीमुळे तुमचा घोटाळा होऊ शकतो. कामे उलटपालट होऊन जातील. अतिरिक्त राग आणि वादविवाद टाळा. नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढेल. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील.
आज दिवस लाभदायक आहे. काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. यामुळे रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग राहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. व्यापारात प्रगतीकारक दिवस असुन अचानक आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरेल.
आज आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. आपला छंद जोपासाल. नवनवीन कल्पना सुचतील. दिनमान उत्तम असल्याने अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. यश मिळेल. पैशाची कामे मनासारखी घडतील. प्रगती होईल. परिस्थितीचा उत्तम आढावा घेताना स्वतःची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
आज नवीन प्रॉपर्टी संबंधी विचार प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील. पैशाची आवक चांगली राहील. मोठे यश प्राप्त होईल. नोकरदारास सलोख्याचे वातावरण अनुभवता येईल. धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. भावडांशी वादविवाद टाळा. नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल.
आज नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत. वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात. नोकरीत केलेली चुकू महागात पडेल. कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. शासकीय सेवेत प्रलोभनांना बळी पडू नये. कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा. व्यापारात कर्जप्रकरणे नामंजूर होतील. कर्ज घेणे देणे टाळावे. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. मोठे व्यवहार व प्रवास टाळावेत. वाहने सावकाश चालवा. अपघात भय संभवते.
आज मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
आज व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाऊ शकतात. ताणतणाव वाढेल. वरिष्ठांकडून कामाचा दबाव राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्याचा विचार टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
संबंधित बातम्या