Holika Dahan 2025: होलिका दहनाच्या दिवशी करू नका ‘या’ ५ चुका, जाणून घ्या या दिवशी काय करू नये
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Holika Dahan 2025: होलिका दहनाच्या दिवशी करू नका ‘या’ ५ चुका, जाणून घ्या या दिवशी काय करू नये

Holika Dahan 2025: होलिका दहनाच्या दिवशी करू नका ‘या’ ५ चुका, जाणून घ्या या दिवशी काय करू नये

Published Mar 12, 2025 12:17 PM IST

Holika Dahan 2025 : भद्रा मुहूर्तावरच होलिका दहन करणे नेहमीच शुभ मानले जाते. होलिका दहनाचे ही काही नियम आहेत. होलिका दहनाला काही चुकीच्या गोष्टी केल्याने करिअर आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो.

होलिका दहन
होलिका दहन

Holika Dahan 2025 : होळीचा सण दरवर्षी साजरा केला जातो. होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते. होलिका दहन नेहमी मुहूर्त पाळून करावे. होलिका दहन भद्रा मुहूर्तातच केले जाते. होलिका दहनाचे ही काही नियम आहेत. होलिका दहनाला काही गोष्टी केल्याने करिअर आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी विसरूनही या गोष्टी करणे टाळा -

होलिका दहनाच्या दिवशी करू नका या 5 चुका, जाणून घ्या या दिवशी काय करू नये

१. कर्ज घेणे - होलिका दहनाच्या दिवशी १३ मार्च २०२५ रोजी कोणालाही पैसे उधार देणे टाळावे. होलिका दहनाला पैसे उधार दिल्यास आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

२.फाटलेले आणि जुने कपडे- होलिका दहनाच्या दिवशी फाटलेले आणि जुने कपडे घालणे टाळावे. कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी फाटलेले कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की फाटलेले आणि जुने कपडे परिधान केल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.

३. सामूहिक मद्यपान- होलिका दहनाच्या दिवशी मद्यपान करू नये. या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन केल्याने भगवान विष्णू नाराज होऊ शकतात.

४. काळे कपडे - धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही शुभप्रसंगी किंवा पूजेच्या वेळी काळे कपडे घालू नयेत. त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे. भगवान विष्णूचा असीम आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ राहील.

५. अनादर - या दिवशी कोणाचेही मन दुखवू नये आणि वादविवादही टाळावेत. कोणाचाही अपमान करणे टाळा आणि कोणाचीही खिल्ली उडवू नका.

डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner