Vakri Guru : ग्रहांचे संक्रमण होण्यासाठी प्रत्येक ग्रहाचा एक विशेष कालावधी निश्चित आहे. या कालगणनेनुसार ग्रहांचे राशीचक्रातील प्रत्येक राशीत संक्रमण होत असते. कधी ग्रहाचे राशीपरिवर्तन होते, कधी ग्रह वक्री होतात, कधी ग्रहाचा उदय होतो तर कधी ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन होते. या प्रत्येक बदलाचा सरळ परिणाम सर्व राशींवर, देश आणि जगावर होत असतो. ज्योतिषशास्त्रातील प्रत्येक ग्रहाचे विशेष महत्व आहे.
ज्योतिष शास्त्रात बृहस्पति हा सुख, सौभाग्य, संपत्ती आणि समृद्धी इत्यादींचा कारक मानला जातो. गुरू ग्रह वेळोवेळी आपली स्थिती बदलून मानवी जीवनावर तसेच देश आणि जगावर प्रभाव टाकतो. गुरु ग्रह सध्या वृषभ राशीत भ्रमण करत आहे. सुमारे १२ वर्षांनंतर, गुरू ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि संक्रमण करत आहे. ९ ऑक्टोबर रोजी, गुरू ग्रह वृषभ राशीमध्ये वक्री गतीने फिरेल. गुरू ग्रह ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रतिगामी स्थितीत राहील. गुरूच्या वक्री हालचालीमुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडू शकतात. जाणून घ्या या राशींबद्दल-
मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरूची वक्री चाल त्यांच्या कामात यश मिळवून देईल. या काळात तुम्हाला पैसे येताना दिसतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि इतरही अनेक मार्गाने पैसा येत राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात तुम्ही काही चांगल्या बातम्यांची अपेक्षा करू शकता.
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरूची उलटी चाल शुभ राहणार आहे. गुरू ग्रहाच्या प्रतिगामी हालचालीमुळे तुमचे नशिब चमकेल आणि खास बदल घडतील. या काळात तुम्ही कोर्टात विजय मिळवाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरीत असलेल्यांना प्रगतीसोबतच उत्पन्नातही वाढ होऊ शकते. आर्थिक बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरूची प्रतिगामी चाल अतिशय शुभ आणि लाभदायक असणार आहे. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रगतीची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक आहे. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पैशाची आवक वाढेल. आर्थिक प्रगतीच्या संधी मिळतील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)