Guru Purnima : यंदाची गुरुपौर्णिमा ठरणार अत्यंत खास! ४ दुर्मिळ योग ' या' राशींना करणार मालामाल, होणार लाभ
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Guru Purnima : यंदाची गुरुपौर्णिमा ठरणार अत्यंत खास! ४ दुर्मिळ योग ' या' राशींना करणार मालामाल, होणार लाभ

Guru Purnima : यंदाची गुरुपौर्णिमा ठरणार अत्यंत खास! ४ दुर्मिळ योग ' या' राशींना करणार मालामाल, होणार लाभ

Jul 18, 2024 11:17 AM IST

Guru purnima 2024 : २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. आषाढ मासातील शुक्ल पक्षाची पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असते. या दिवशी काही खास योग तयार होत आहे, या योगांचा फायदा राशीचक्रातील काही राशींना मिळणार आहे.

गुरुपौर्णिमा २०२४
गुरुपौर्णिमा २०२४

हिंदू धर्मात आषाढ महिन्याला प्रचंड महत्व आहे. हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ समजला जातो. त्यामुळेच या महिन्यात विविध सण साजरे केले जातात. त्यातीलच एक म्हणजे गुरुपौर्णिमा होय. गुरुपौर्णिमेला या धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. येत्या २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. आषाढ मासातील शुक्ल पक्षाची पौर्णिमाच गुरुपौर्णिमा असते. गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हटले जाते.

यादिवशी हिंदू धर्मातील महान काव्यरचिता महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. हा सण प्रामुख्याने त्यांना वंदन करण्यासाठी साजरा करतात. शिवाय भारतीय संस्कृतीत गुरूचा दर्जा प्रचंड मोठा आहे. यादिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरूला वंदन करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो. यंदाची गुरुपौर्णिमा प्रचंड खास असणार आहे. कारण यादिवशी ४ दुर्मिळ योग एकत्रित जुळून आले आहेत. या योगांचा फायदा राशीचक्रातील काही राशींना मिळणार आहे.

२१ जुलै रोजी साजरी होत असलेली गुरु पौर्णिमा वास्तविक २० तारखेला प्रारंभ होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी २१ तारखेला दुपारी समाप्त होईल. अशा स्थितीत अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत विविध योगांची निर्मिती करत आहेत. यंदाची गुरुपौर्णिमा ज्योतिषीय अभ्यासानुसार अत्यंत खास असणार आहे. कारण यादिवशी अनेक चमत्कारिक योग घटित होत आहेत. गुरुपौर्णिमेदिवशी प्रीती योग, विश्वकुंभ योग, सर्वार्थ सिद्धी योग असे एक ना अनेक योग एकत्रित जुळून आले आहेत. हे योग राशीचक्रातील दोन राशींवर अत्यंत शुभ प्रभाव टाकणार आहेत. त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

धनु

गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून आलेले शुभ योग धनु राशीच्या लोकांना प्रचंड लाभदायक ठरणार आहेत. कारण यादिवशी तुम्हाला सर्वात शुभ ग्रह असणाऱ्या बृहस्पती गुरुदेवाचा आशीर्वाद लाभणार आहे. यादिवशी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित कोणत्याही कार्यात तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. विविध मार्गाने धनलाभ होईल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. आर्थिक आवक वाढल्याने लाइफस्टाइलमध्ये सुधारणा होईल.

मीन

गुरुपौर्णिमेदिवशी जुळून आलेल्या योगांचा फायदा मीन राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. तुमच्या लहान मुलांच्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. यादिवशी तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. त्यामुळे मन आनंदी आणि उत्साही राहील. कार्यक्षेत्रात उत्तम संधी प्राप्त होतील. नोकरदारवर्गाला पगारवाढ किंवा बढती मिळण्याचा योग आहे. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढेल. कौटुंबिक मतभेद दूर होऊन संबंध सुधारतील.

Whats_app_banner