Guru Pradosh Vrat Upay In Marathi : प्रदोषाचे व्रत दर महिन्यातून २ वेळा ठेवले जाते, जे भगवान शंकरला समर्पित आहे. गुरु प्रदोषाचे व्रत पूर्ण नियमाने केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात, असे मानले जाते. संध्याकाळी गुरु प्रदोष व्रताची पूजा करणे शुभ मानले जाते, त्याचबरोबर गुरु प्रदोषाच्या दिवशी राशीनुसार काही उपायांच्या मदतीने जीवनातील दु:ख आणि आर्थिक समस्यांपासूनही मुक्ती मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीसाठी गुरु प्रदोष व्रताचे उपाय –
त्रयोदशी, २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०६ वाजून २३ मिनिटांनी सुरू होईल आणि २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०८ वाजून ३९ मिनिटांनी संपेल. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाची पूजा करण्याची उत्तम वेळ सायंकाळी ०५.२३ ते ०८.०५ अशी असेल. पूजेचा एकूण कालावधी ०२ तास ४२ मिनिटे इतका आहे.
मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकरचा अभिषेक करा.
या राशीच्या लोकांनी भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करावे.
या राशीच्या लोकांनी महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा.
या राशीच्या लोकांनी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी कन्हेरचे फुल अर्पण करावे.
सिंह राशीच्या लोकांनी महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महादेवाला भांग अर्पण करा.
या राशीच्या लोकांनी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर धोत्राचे फुल अर्पण करावे.
तुळ राशीच्या लोकांनी महादेवाला पंचामृताने अभिषेक करा.
वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान शंकराची विधिवत पूजा करावी आणि शिव चालीसा वाचावी.
या राशीच्या लोकांनी महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ॐ नम: शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
या राशीच्या लोकांनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शिव चालीसा वाचा.
कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावे आणि भगवान शंकराला गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा.
या राशीच्या लोकांनी शनीचा अनिष्ट प्रभाव कमी करण्यासाठी शिवलिंगाला कच्च्या दुधाने अभिषेक करावा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)