Guru Gochar : ११९ दिवसानंतर गुरु होणार मार्गी, या ४ राशींना सुवर्णकाळ, आकस्मिक आर्थिक लाभ होणार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Guru Gochar : ११९ दिवसानंतर गुरु होणार मार्गी, या ४ राशींना सुवर्णकाळ, आकस्मिक आर्थिक लाभ होणार

Guru Gochar : ११९ दिवसानंतर गुरु होणार मार्गी, या ४ राशींना सुवर्णकाळ, आकस्मिक आर्थिक लाभ होणार

Jan 09, 2025 03:45 PM IST

Guru Margi 2025 Effect In Marathi : गुरु फेब्रुवारीमध्ये मार्गी हालचाल सुरू करेल. गुरूच्या मार्गी चालीचा अनेक राशींवर शुभ परिणाम होईल. या नशीबवान राशी कोणत्या आहेत, जाणून घ्या कोणत्या राशींना गुरूच्या मार्गी होण्याचा फायदा होईल-

गुरु ग्रहाचे संक्रमण २०२५
गुरु ग्रहाचे संक्रमण २०२५

Guru Margi 2025 In Marathi : देवगुरु गुरू सुख, धन, ज्ञान, भाग्य आणि वैभव इत्यादींचा कारक मानला जातो. ४ फेब्रुवारीला गुरू वक्री होईल. गुरूची वक्री गती म्हणजे उलट चाल आणि मार्गी म्हणजे सरळ चाल. पंचांगानुसार गुरु बुधवार, ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वक्री झाला होता आणि मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२५ रोजी मार्गी होणार आहे. गुरू ११९ दिवस वक्री चालीत राहतो. गुरूच्या मार्गी होण्याचा मेष आणि मीन सर्व १२ राशीवर परिणाम होईल. ज्योतिषीय गणनेनुसार गुरुची मार्गी अवस्था चार राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. या राशींना आर्थिक यश आणि प्रगतीही मिळेल. जाणून घ्या गुरूच्या मार्गी होण्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल.

गुरुची मार्गी चाल या ४ राशींसाठी लाभदायक -

मेष - मेष राशीच्या लोकांसाठी गुरू दुसऱ्या भावात भ्रमण करेल, हे धनाचे घर मानले जाते. गुरूच्या प्रभावाने आर्थिक प्रगती होऊ शकते. आकस्मिक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. जीवनात सुख-शांती राहील. आपण आपल्या प्रिय जनांसोबत असाल. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. एकंदरीत आनंददायी काळ निर्माण होईल.

कन्या - कन्या राशीच्या नवव्या भावात गुरू फिरणार आहे. गुरूच्या प्रभावाने उपजीविका व रोजगारात प्रगती होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. जुन्या स्त्रोतांकडूनही पैसे मिळतील. व्यापाऱ्यांना नफा होईल. आर्थिक लाभ होईल. नशिबाच्या जोरावर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळवू शकता. जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक - गुरू वृश्चिक राशीच्या सातव्या भावात भ्रमण करेल. वृश्चिक राशीसाठी गुरूचा मार्ग शुभ राहील. गुरुकृपेने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीच्या चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. कामातील अडथळे दूर होतील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. चांगली बातमी मिळू शकते. प्रवासात फायदा होईल.

मकर - मकर राशीच्या लोकांसाठी गुरूच्या कृपेने आर्थिक प्रगतीबरोबरच नोकरीत प्रगती मिळू शकते. काही जातकांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner