Guru Mangal Yuti : ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रह स्थित आहेत. यापैकी काही ग्रह मित्र ग्रह असतात. तर काही ग्रहांचा एकमेकांशी फारसा संपर्क येत नाही. परंतु असे ग्रह कधी एकत्र आले तर फारच चमत्कारिक परिणाम दिसून येतात. असंच काहीसं यावेळी घडून आलं आहे. मंगळ आणि गुरुचा दुर्मिळ योग जुळून येत आहे. या दोन्ही ग्रहांच्या संयोगातून शुभ योग निर्माण होणार आहेत. आणि त्यांचा फायदा राशीचक्रातील राशींना मिळणार आहे. पाहूया मंगळ-गुरुच्या संयोगातून नेमकं काय घडणार आहे.
जुलै महिना सुरू होण्यास केवळ दोन दिवस उरले आहेत. या महिन्यात ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांचे गणित बदलेले पाहायला मिळेल. जुलै महिन्यात गुरु आणि मंगळचा दुर्मिळ संयोग होणार आहे. या महिन्यात गुरु आणि मंगळ वृषभ राशीत एकत्र विराजमान होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि मंगळ यांच्या संयोगाने शुभ परिणाम पाहायला मिळतात असे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे तब्बल ११ वर्षांनंतर वृषभ राशीत गुरु-मंगळचा संयोग जुळून येत आहे. त्यामुळे ही युती वैदिक शास्त्रात अतिशय खास मनाली जात आहे. या संयोगाचा फायदा कोणत्या राशींना होणार जाणून घेऊया.
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ-गुरु संयोग अतिशय शुभ राहील. याकाळात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसन्मान मिळेल. नोकरी आणि व्यवसायात वेगाने प्रगती होण्याची शक्यता आहे. शिवाय तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला काही प्रतिष्ठित लोकांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहकार्याने तुमच्या कामात सुधारणा होईल. व्यापार-उद्योगात चांगले आर्थिक लाभ मिळेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांना गुरु-मंगळच्या दुर्मिळ योगाचा पुरेपूर लाभ मिळणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. मनात आखलेल्या योजना प्रत्यक्षात अंमलात येतील. त्यामुळे आत्मविश्वास प्रचंड वाढेल. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षेपक्षा अधिक काम मिळेल. त्यामुळे मोठा आर्थिक फायदा होईल. विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांना लग्नाचा योग आहे. शिवाय विवाहितांना उत्तम गृहसौख्य लाभेल.
गुरु-मंगळच्या संयोगामुळे जुलै महिना मकर राशीसाठी वरदान ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. नोकरी-व्यवसायात सकारात्मक बदल घडून येतील. आर्थिक स्थिती भक्कम होईल. घरामध्ये महागड्या वस्तूंची खरेदी कराल. ऐषारामी आयुष्य जगण्याकडे कल राहील. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने समाजात मानसन्मान,पदप्रतिष्ठा वाढेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठीसुद्धा गुरु-मंगळची युती लाभदायक ठरणार आहे. याकाळात तुम्हाला समाजात प्रचंड मानसन्मान आणि आदर लाभेल. तुमचे व्यक्तिमत्व आणखी उठावदार बनेल. याकाळात अत्यंत कठीण कामसुद्धा सहजरित्या पूर्ण होतील. महत्वाच्या कामात मित्रांचा पाठिंबा लाभेल. अनपेक्षितपणे धनलाभ होईल. पैसे आल्याने अर्थिकी स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी समाधानाकरक असणार आहे.