Guru Gochar New Year 2025 Effect In Marathi : ग्रहांची हालचाल बदलल्याने सर्व १२ राशींवर परिणाम होतो. प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार आपली राशी आणि नक्षत्र बदलतो. ग्रहांच्या बदलाचा काही राशींना शुभ परिणाम मिळतो तर काही राशीच्या लोकांना अशुभ परिणाम मिळतो. वर्ष २०२४ संपून आता नवीन वर्ष २०२५ सुरू व्हायला काहीच दिवस बाकी आहे. अशात नवीन वर्षातही ग्रहांची बदलती चाल काही राशींना मोठा फायदा करून देणार आहे.
नवीन वर्ष २०२५ मध्ये देवगुरू बृहस्पती ३ वेळा चाल बदलणार आहे. १४ मे २०२५ रोजी गुरू वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १८ ऑक्टोबरला गुरु ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ३ डिसेंबर रोजी गुरू पुन्हा वक्री अवस्थेत मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात देवगुरु गुरूला विशेष स्थान आहे. ज्ञान, शिक्षक, मुले, मोठा भाऊ, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थान, धन, दान, पुण्य आणि वृद्धी इत्यादींचा कारक गुरु ग्रह असल्याचे म्हटले जाते. २७ नक्षत्रांपैकी गुरु हे ग्रह पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वभाद्रपद नक्षत्राचे स्वामी आहेत. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची हालचाल बदलणे फार महत्त्वाचे मानले जाते. गुरुची चाल ३ वेळा बदलल्यास काही राशींना फायदा होईल. जाणून घेऊया, २०२५ मध्ये ३ वेळा गुरुचा वेग बदलल्याने कोणत्या राशींना फायदा होईल-
मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल, कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ व्यतीत होईल. कार्यक्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील.
मिथुन राशीच्या लोकांना बुध देवाच्या कृपेने कामात यश मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण आपण केलेल्या कामाचे कौतुक करेल. नशीब साथ देईल. दांपत्य जीवनात आनंदाचा अनुभव घ्याल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ चांगला जाईल. नवीन संधी प्राप्त होतील.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. दांपत्य जीवन सुखी राहील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात फायदा होईल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना शुभ परिणाम मिळतील.
डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
संबंधित बातम्या