वैदिक शास्त्रानुसार नवग्रह कार्यरत आहेत. या नऊ ग्रहांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे. या ग्रहांचे प्रत्येकाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. यामध्ये गुरु ग्रहाला देवतांचा गुरु म्हणून संबोधले जाते. शिवाय गुरुला ज्ञान, ज्योतिष, शिक्षण, संपत्ती, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव यांचा कारक समजले जाते. गुरु ज्या राशींवर प्रभाव टाकतो त्या राशींना या गुणधर्मांचा पुरेपूर फायदा होतो. काही दिवसांपूर्वी गुरुने वृषभ राशीत प्रवेश केला होता. येत्या २०२५ पर्यंत गुरु त्याच स्थानावर राहून राशींना प्रचंड लाभ देणार आहे. त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया.
१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी गुरु ग्रहाने वृषभ राशीत गोचर केले होते. गुरु वर्षभर याच राशीत विराजमान असणार आहे. ऑक्टोबरमध्ये गुरू या राशीतून वक्री होईल. गुरुच्या वृषभ राशीत प्रवेशाने वर्षभरात अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. या शुभ योगांचा फायदा राशी चक्रातील काही राशींना होणार आहे. एकंदरीत वर्षभर या राशींचे अच्छे दिन येणार आहेत.
गुरुच्या वृषभ राशीत प्रवेशाने वृषभ राशीच्या लोकांना शुभ लाभ होणार आहे. याकाळात घेतलेले निर्णय योग्य ठरतील. नोकरीत एका नव्या समुहाशी आपला संबंध जुळण्याचा योग आहे. कुटुंबातील सदस्याकडून उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे फायदेशीर राहील.
धनु राशीलासुद्धा वर्षभर गुरुची साथ लाभणार आहे. याकाळात मुलांच्या बाबतीत चांगले संकेत मिळतील. व्यापारात नवीन योजना आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहेत.विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. परदेशासंदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. रोजगारात प्रगती होईल. जबाबदारी वाढणार आहे. कार्यक्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध कराल. पराक्रम व साहसी वृत्तीत वाढ होईल. व्यापारात नवीन संधी सोडू नका.
गुरु वृषभ राशीत विराजमान असल्याने कर्क राशी फायद्यात राहणार आहे. याकाळात महत्वपूर्ण कार्यात विशेष यश येईल. नोकरी व्यापारात योग्य प्रतिसाद मिळेल. मोठा आर्थिक फायदा होईल. आकस्मिक धनलाभ झाल्याने मन प्रसन्न राहील. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. मनोरंजनाकडे कल वाढेल. छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष दया. नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत फिरायला जाण्याचा योग जुळून येईल.
याकाळात तुमच्यात सकारात्मक बदल दिसून येईल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. याकाळात पदोन्नती किंवा पगारवाढ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. अध्यात्माची आवड निर्माण होईल. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. धार्मिक कार्य करण्याची संधी मिळेल. धार्मिक व्यक्तिंच्या सहवास लाभेल. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यापार व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध घेतील. प्रेमीजनांना अनुकूल दिनमान आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वतःच करा. मुलांच्या बाबतीत प्रसन्नतापूर्वक वातावरण राहणार आहे.
तुम्हाला वर्षभर गुरुच्या कृपेने नशिबाची साथ लाभणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुमच्या प्रेमळ आणि मर्यादशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी मात्र घ्यावी लागेल. याकाळात स्थावर मालमत्ता संबंधातील समस्या दूर होतील. नवीन योजना फायदेशीर ठरतील.व्यापारात काही नवीन भागीदार सोबत संबंध प्रस्थापित कराल. गृहसौख्यत जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत. आपला लौकिक सांभाळण्याचा प्रयत्न करावा. कलाकारांना योग्य व्यासपीठ उपलब्ध होईल.