Jupiter Transit In Marathi : ज्योतिषशास्त्रात देवगुरु गुरूला विशेष स्थान आहे. देवगुरु गुरूला ज्ञान, शिक्षक, मुले, मोठा भाऊ, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थान, धन, दान, सदाचार आणि वृद्धी इत्यादींचा कारक म्हटले जाते. गुरु ग्रह २७ नक्षत्रांमध्ये पुनर्वसु, विशाखा आणि पूर्व भाद्रपद नक्षत्रांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची हालचाल बदलणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ग्रहांची हालचाल बदलल्याने सर्व १२ राशींवर परिणाम होतो.
वर्ष २०२५ मध्ये देवगुरू गुरू ३ वेळा चाल बदलणार आहे. १४ मे २०२५ रोजी गुरू वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १८ ऑक्टोबरला तो कर्क राशीत प्रवेश करेल. ३ डिसेंबर रोजी गुरू पुन्हा वक्री अवस्थेत मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरूच्या ३ राशी परिवर्तनाचा फायदा काही राशींना होईल. जाणून घेऊया, २०२५ मध्ये ३ वेळा गुरूची चाल बदलल्याने कोणत्या राशींना फायदा होईल-
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरूचे संक्रमण अत्यंत फायदेशीर ठरेल. या राशीच्या अविवाहीत लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाला गती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन पद मिळू शकते.
मिथुन राशीच्या लोकांना गुरू राशी परिवर्तनाचा फायदा होईल. ज्यांना या कालावधीत बदली करायची आहे त्यांना इच्छित परिणाम मिळू शकतात. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर परतावा येऊ शकतो. आर्थिक बाबतीत लाभ होईल. नव्या मार्गाने पैसे येतील. जुन्या वाटेवरूनही पैसे मिळतील. गुंतवणुकीतून चांगला नफा होईल.
गुरू च्या राशी बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. या काळात तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. नशीब साथ देईल. सुदैवाने काही कामे होतील. आर्थिक बळ प्राप्त होईल. या काळात तुम्हाला जमीन, इमारत किंवा वाहनाचा आनंद मिळू शकतो.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)